accident
accident

सतत होणाऱ्या अपघातांबाबत नागरिकांनी वाहतूक पोलिसांवर रोष व्यक्त केला. या एमआयडीसी मार्गावर हायवा ट्रकवर चालकाची शर्यत पाहायला मिळते.

  वडगाव मावळ : भरधाव हायवा ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना वडगाव मावळ एमआयडीसी परिसरातील रोडवर घडली.

  प्रथमेश संतोष वाजे (वय १९ रा. पुसाणे ता मावळ), गंधर्व किशोर मोरे (वय १९ रा. कासारसाई ता.मुळशी) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी ट्रकचालक राजू गंगा स्वामी (रा.देहरोड ) याला अटक करण्यात आली आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार प्रथमेश आणि गंधर्व हे आपल्या (एमएच १४ जी जी ६८७४) या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या हायवा ट्रकने (एमएच १४ जे.एन ९११४) जोरदार ठोकर दिली. या अपघातात दोघे ट्रक खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

  सततच्या अपघाताने नागरिक संतप्त

  सतत होणाऱ्या अपघातांबाबत नागरिकांनी वाहतूक पोलिसांवर रोष व्यक्त केला. या एमआयडीसी मार्गावर हायवा ट्रकवर चालकाची शर्यत पाहायला मिळते. वाहतूक पोलिस कारवाई करत नसल्याने हायवा ट्रकचालक सोकावले असल्‍याचे नागरिक आरोप करत आहेत.

  पोलिसांचे दुर्लक्ष, नागरिकांचा आरोप

  पोलिसांचे दुर्लक्षपणामुळे नागरिकांचा हकनाक बळी जात असल्याची संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली.

  आणखी किती बळी घेणार? 

  या एमायडीसी रोडवर ट्रक भरधाव वेगाने असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासन आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी घेणार, असा सवाल नागरिक करत आहेत.