कामावरून घरी परताना अपघात, 13 दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

अमरावतीवरून कामाहून घरी येत असताना रासेगावजवळ सागर पाचघरे यांच्या दुचाकीला 5 डिसेंबर रोजी अपघात झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. अमरावतीवरून कामानिमित्त घरी येत असताना रासेगावजवळ सागर पाचघरे यांचा मोटरसायकलचा रात्री अपघात झाला होता.

    अंजनगाव : अमरावतीवरून कामाहून घरी येत असताना रासेगावजवळ सागर पाचघरे यांच्या दुचाकीला 5 डिसेंबर रोजी अपघात झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. अमरावतीवरून कामानिमित्त घरी येत असताना रासेगावजवळ सागर पाचघरे यांचा मोटरसायकलचा रात्री अपघात झाला होता. तो रात्रभर घटनास्थळावरच पडून होता.

    दुसऱ्या दिवशी 6 डिसेंबर रोजी सकाळी कामावर जाणाऱ्या मजुरांना मोबाईल फोन वाजत असल्याचा निदर्शनास आल्यावर बाजुलाच सागर रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. मजुरांनी घरच्यांना कळविल्यावर घरच्यांनी त्यांना पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती येथे दाखल केले. त्याचे दोन ऑपरेशन सुद्धा झाले होते.

    दरम्यान, सागरच्या जगण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असतानाच सागरने 13 दिवसांपर्यत मृत्यूशी झुंज दिल्यावर अखेर रात्री सव्वा दहाच्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली. सागरच्या मृत्यने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.