कोरोनाचा नवा व्हायरस घातक? बोलण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो परिणाम, नवीन संशोधनात धक्कादायक खुलासा

कोरोनासंदर्भातील ताज्या संशोधनाने सर्वांनाच चकित केले आहे. असे आढळून आले आहे की या धोकादायक विषाणूमुळे केवळ चव आणि गंधच नाही तर घशाचेही गंभीर नुकसान होऊ शकते.

    कोरोनाचं संकट अजूनपर्यंत हद्दपार नाही झालेलं नाही आहे. काही दिवसापुर्वी केरळमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन सब-व्हेरियंट जेएन.१ (COVID sub variant) ची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे भारतात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसत आहे. कोरोनाच वेगानं होणारा प्रसार पाहता केंद्र सरकारकडून आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहे. मात्र, कोरोनाच्या या JN.1 व्हायरस संदर्भातील ताज संशोधन समोर आलं आहे. या संशोधनाच्या अहवालाने काहीशी चिंतेत वाढ होऊ शकते. विषाणूमुळे केवळ रुग्णाची चव आणि गंधच नाही तर घशाचेही गंभीर नुकसान होऊ शकते. यामुळे बोलण्याच्या क्षमतेवरही परिणाम कमी होऊ शकतो. अशी माहिती समोर आली आहे.

    कोरोनाचा नवीन प्रकार, JN.1, आता केवळ चीन-सिंगापूरमध्येच नाही तर भारताच्या अनेक भागांमध्ये आढळला आहे.  या नवीन संसर्गाने रुग्ण केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या काही भागात आढळल्यामुळे चिंता वाढली आहे. Omicron च्या JN.1 या नवीन सब-व्हेरियंटने बद्दल एक नवं संशोधन समोर आलं आहे. की या धोकादायक विषाणूमुळे केवळ चव आणि गंधच नाही तर घशाचेही गंभीर नुकसान होऊ शकते. एका प्रकरणात, कोरोना विषाणूमुळे 15 वर्षांच्या मुलीचा आवाज गेला.

    SARS-CoV-2 संसर्गानंतर द्विपक्षीय व्होकल कॉर्ड पॅरालिसिस नावाचे संशोधन सामान्य बालरोगशास्त्रात दिसून आले आहे. ज्यामध्ये असे आढळून आले आहे की कोरोनाचा संसर्ग घशातही होतो, इतका की तो घशाच्या आवाजापर्यंतही पोहोचू शकतो. तज्ज्ञांच्या मते याला व्होकल कॉर्ड पॅरालिसिस म्हणतात. यामध्ये तुमचे स्वर भाग प्रभावित होतात. संसर्गाच्या बाबतीत, आपण हळूहळू बोलण्याची क्षमता गमावू शकता. हे अत्यंत धोकादायक आहे.

    मंत्री सौरभ भारद्वाज यांनी नोव्हेंबर-2023 या कालावधीत चीनमधील मुलांमध्ये न्यूमोनियासह श्वसनाच्या आजारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर 30 नोव्हेंबर रोजी श्वसन औषध तज्ञांसोबत बैठक बोलावली होती. ज्यामध्ये RT PCR द्वारे न्यूमोनियाच्या गंभीर प्रकरणांची चाचणी करणे, नमुन्यांचा तपशील राखणे आणि अँटी-व्हायरल औषधांचा पुरेसा साठा राखणे यावर SOP जारी करण्यात आला. यामध्ये 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत सर्व रूग्णालयांमध्ये विविध बाबींवर तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आले.

    कोरोनाचा धोका पाहता 20 डिसेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही सर्व आरोग्य मंत्र्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत दर तीन महिन्यांनी कोविड चाचणी आणि रुग्णालयांच्या मॉक ड्रिलवर चर्चा करण्यात आली.