Arrest

शहरातील चिमणशा मळा येथील पाच वर्षीय चिमुकलीला घरात चित्रपट दाखविण्याच्या आमिषाने बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अजिनाथ सावळाराम शिंदे (वय ५५) यास बारामती येथील न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शहरातील चिमणशा मळा येथील पाच वर्षीय चिमुकलीला घरात चित्रपट दाखविण्याच्या आमिषाने बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अजिनाथ सावळाराम शिंदे (वय ५५) यास बारामती येथील न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

    बारामती शहरात चिमणशा मळा येथे १२ एप्रिल २०१८ रोजी पाच वर्षाच्या मुलीला घरात चित्रपट दाखवण्याच्या आमिषाने बोलून आरोपी आजिनाथ सावळाराम शिंदे याने स्वतःचे कपडे उतरून लैंगिक अत्याचार करण्याच्या तयारीत तो होता. त्याचवेळी आजूबाजूच्या मुलांनी सदरची घटना तिच्या आईस सांगितली. तात्काळ त्यांनी सदर ठिकाणी जाऊन पुढील अत्याचार थांबवला. नंतर या पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

    विनयभंग व बाललैंगिक अत्याचार कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा नोंद झाला. महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे यांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र कोर्टात तात्काळ सादर केले. या केसमध्ये सर्व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हे आपल्या साक्षीवर टिकून राहिली.

    कोर्ट पैरवी म्हणून व्ही. एल. लोकरे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नलावडे यांनी उत्कृष्ट काम केले. तसेच पोलिस कर्मचारी निकम यांनी वेळेत समन्स बजावणी केलेली आहे तसेच सरकारतर्फे सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी कोर्टामध्ये अतिशय चांगला युक्तिवाद केला. आरोपीची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. याप्रकारे शिक्षा झाल्यानंतर समाजातील अपप्रवृत्तींना आळा बसून या प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.