नवनीत राणा यांनी अभिनय, राजकारणानंतर क्रीडा क्षेत्रातही गाजवली कारकीर्द; जाणून घ्या त्यांची कामगिरी

राजस्थानी हितकारक महिला मंडळाच्या वतीनं येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या (Hanuman Vyayam Prasarak Mandal) प्रांगणात महिलांसाठी रनिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी भाग घेतला. महिलांसोबत त्या धावल्या. विशेष म्हणजे ही रनिंग स्पर्धा त्यांनी जिंकलीसुद्धा.

    अमरावती (Amaravati): राजस्थानी हितकारक महिला मंडळाच्या वतीनं येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या (Hanuman Vyayam Prasarak Mandal) प्रांगणात महिलांसाठी रनिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी भाग घेतला. महिलांसोबत त्या धावल्या. विशेष म्हणजे ही रनिंग स्पर्धा त्यांनी जिंकलीसुद्धा. खासदारांना धावताना पाहून महिलांना त्यांच्या फिटनेसचा हेवा वाटला.

    महिलांनी वेळात वेळ काढून व्यायाम करावा
    स्पर्धा जिंकल्यानंतर नवनीत राणा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्या म्हणाल्या. दैनंदिन जीवनात महिलांची खूप धावपळ होते. अशावेळी त्यांनी व्यायामासाठी वेळ काढणे अत्यंत आवश्यक आहे. स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढून व्यायाम केला पाहिजे. तरच तुम्ही आरोग्यसंपन्न आणि सुखी राहू शकाल, असा सल्ला राणा यांनी महिलांना दिला.

    नवनीत राणा यांनी वाढविला उत्साह
    रनिंग स्पर्धेत भाग घ्यायचा की नाही, यावरून काही महिला शासंक होत्या. परंतु, खासदार राणा या स्वतः त्यात सहभागी झाल्या. त्यामुळं इतर महिलांनाही प्रेरणा मिळाली. धावणे हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. यामधून आत्मविश्‍वास निर्माण होत असतो. संपूर्ण दिवस ताजातवाणा राहतो. रनिंग करणे अगदी सोपे आहे. कोणत्याही खेळाची सुरुवात करताना सुरुवातीला वार्मअप करावे लागते. त्यात रनिंग येतेच.