शिक्षणाधिकारी, अधिक्षकांवर हाेणार कारवाई ; लाच प्रकरणाचा अहवाल शासनाला सादर

जिल्हा परिषदेचे लाचखोर माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधिक्षक विजयकुमार सोनवणे यांच्यावर कारवाईची शिफारस करणारा अहवाल शासनाला पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.

  सांगली : जिल्हा परिषदेचे लाचखोर माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधिक्षक विजयकुमार सोनवणे यांच्यावर कारवाईची शिफारस करणारा अहवाल शासनाला पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि अधीक्षक विजयकुमार सोनवणे यांना दोन दिवसापूर्वी एक लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या दोन्ही अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे सोपवला.

  कांबळे आणि सोनवणे यांनी तीन शिक्षकांची पदवीधर वेतनश्रेणी मान्यता करून देण्याच्या मोबदल्यात एक लाख ७० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शुक्रवारी रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

  निलंबनाची कारवाई होऊ शकते
  दोन्ही अधिकाऱ्‍यांना दोन दिवस कोठडी मिळाल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. या दोन्ही अधिकार माऊली कारवाईचा अहवाल आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी ड्यूटी यांच्याकडे सोपवला.

  शिक्षण आयुक्तांकडे पाठविणार प्रस्ताव
  या अहवालासोबत शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व अधिक्षक सोनवणे यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्याकडे पाठविणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल, असे डुडी यांनी सांिगतले.