मनी लाँडरिंग प्रकरणी नोरा फतेहीचं ईडी कार्यलयात दाखल

ईडीच्या माहितीनुसार, नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांना ठग सुकेश चंद्रशेकरकडून आलिशान कार आणि इतर महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. याबबत तिला प्रश्न विचारला जाऊ शकतो.

    अभिनेत्री नोरा फतेहीचं नाव सध्या खूपच चर्चेत आहे. बहुचर्चित मनी लाँडरिंग प्रकरणी तीचं नाव समोर आलं होत. या प्रकरणी आज ती  चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात दाखल झाली आहे.  200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखरशी संबंधित  अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव समोर आल्यानंतर नोरा फतेहीचही नाव समोर आलं होतं.

    यापूर्वी याच प्रकरणात ईडीने नोरा फतेहीचीही चौकशी केली होती. ईडीच्या माहितीनुसार, नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांना ठग सुकेश चंद्रशेकरकडून आलिशान कार आणि इतर महागड्या भेटवस्तू मिळाल्या. सुकेश चंद्रशेकर, जो सध्या तुरुंगात आहे, त्याच्यावर फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांच्या पत्नी अदिती सिंग यांसारख्या काही हाय-प्रोफाइल व्यक्तींसह विविध लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अनेकदा जॅकलिन फर्नांडिस चौकशी करण्यात आली. 

    सध्या नोरा फतेहीचं नाव चांगलच चर्चेत आलं आहे. फिफा विश्वचषक सामन्यात तीन नृत्य सादर केलं. यावेळी राष्ट्रध्वज उलटा पकडल्याने तिला सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे.