शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचा बिजनेस पार्टरन असलेल्या अभिनेता सचिन जोशीवर ईडीचा फास; 410 कोटींची मालमत्ता जप्त

अभिनेता सचिन जोशीच्या अडचणीत वाढ झाली असून त्याची 410 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात ही कारवाई ईडीने केली. यात 330 कोटींच्या फ्लॅट्सचाही समावेश आहे. याशिवाय पुण्यातील 80 कोटींच्या भूखंडाचाही समावेश आहे. ही सर्व मलामत्ता ओंकार ग्रुप आणि सचिन जोशीची आहे( Actor Sachin Joshi, Shilpa Shetty and Raj Kundra's business partner; Assets worth Rs 410 crore confiscated ).

  दिल्ली : अभिनेता सचिन जोशीच्या अडचणीत वाढ झाली असून त्याची 410 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात ही कारवाई ईडीने केली. यात 330 कोटींच्या फ्लॅट्सचाही समावेश आहे. याशिवाय पुण्यातील 80 कोटींच्या भूखंडाचाही समावेश आहे. ही सर्व मलामत्ता ओंकार ग्रुप आणि सचिन जोशीची आहे( Actor Sachin Joshi, Shilpa Shetty and Raj Kundra’s business partner; Assets worth Rs 410 crore confiscated ).

  वर्षभरापासून चौकशी

  औरंगाबाद सिटी चौक पोलिस ठाण्यात 2020 मध्ये दाखल करण्यात आलेल्यातक्रारीनंतर ईडीने मनी लाँड्रिंगशी संबंधित चौकशी सुरू केली होती. गेल्यावर्षी ईडीने त्याच्या कार्यालयावर धाड टाकली होती आणि मेसर्स ओआरडीपीएलचे व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा, अध्यक्ष कमलकिशोर आणि त्यानंतर जोशीला अटक केली होती. ईडीने मार्च 2021 मध्ये या प्रकरणात मुंबई कोर्टात पहिले आरोपपत्रही सादर केले होते.

  कुंद्राचाही होता भागीदार

  दरम्यान, 410 कोटी रुपयांपैकी 330 कोटींचे लाँड्रिंग ओंकारा ग्रुपद्वारे आणि 40 कोटींचे लाँड्रिंग सचिन जोशी आणि विकिंग ग्रुपद्वारे करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली. गेल्या वर्षभरात ईडीने हजारो कोटींच्या मालमत्तांचा शोध लावला आहे. जोशी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा व्यावसायिक भागीदारही होता. सतयुग गोल्ड प्रकरणात राज कुंद्राविरोधातील खटला त्याने जिंकला होता.

  हे सुद्धा वाचा
  • 2022