annapurna vitthal

अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल(Annapurna Vitthal) यांनी सहकुटुंब सहपरिवार’(Sahkutumb Sahpariwar) मालिकेचे निर्माते आणि सहकलाकारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या मालिकेतील निर्माते आणि सहकलाकारांनी मला मानसिक त्रास (Mental Harassment)दिला. माझे रॅगिंग(Ragging) करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे.

    ‘स्टार प्रवाह’ (Star Pravah)वरील ‘सहकुटुंब सहपरिवार’(Sahkutumb Sahpariwar) या मालिकेत सूर्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल(Annapurna Vitthal) यांनी मालिकेतील निर्माते आणि सहकलाकारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या मालिकेतील निर्माते आणि सहकलाकारांनी मला मानसिक त्रास (Mental Harassment)दिला. माझे रॅगिंग(Ragging) करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे. याबाबतचे काही व्हिडीओ त्यांनी त्याच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केले आहेत.

    अन्नपूर्णा विठ्ठल यांनी या व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार, “मराठी सिनेसृष्टीत अमराठी कलाकारांना टिकू दिले जात नाही. मी गेल्या महिन्यात सहकुटुंब सहपरिवार ही मालिका सोडली. मात्र ही मालिका सोडल्यानंतर मला मालिकेतून बाहेर काढण्यात  आलं अशी अफवा पसरवण्यात आली. या मालिकेत मला मानसिक त्रास देणे, रॅगिंग करणे यात अभिनेत्यांमध्ये सुनिल बर्वे, किशोरी आंबिये, नंदिता पाटकर आणि दिग्दर्शकामध्ये भरत गायकवाड, विठ्ठल डाकवे यासारख्या छोटेमोठे कलाकार यात सहभागी होते. सुनिल बर्वे हा मराठीतील मोठा अभिनेता आहे. पण त्यांनी मला सुरुवातीपासूनच त्रास दिला आहे. इतकच नव्हे तर नंदिता पाटकर आणि किशोरी आंबिये यांनीही मला प्रचंड त्रास दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

    “मराठी सिनेसृष्टी तुमची आहे का? मग जर हिंदी, तेलुगु कलाकारांनी मराठी सिनेसृष्टी काम करु नये ही मानसिकता ठेवत असाल, तर अशी मानसिकता असलेल्यांनी हिंदी आणि तेलुगु सिनेसृष्टीत काम करु नये. तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे,” असेही त्या यावेळी म्हणाल्या.