चार दिवसानंतर नाशिककरांना सुर्याचे दर्शन

    नाशिक : कुसुमाग्रजनगरी, मेट, ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे. ग्रंथ दिंडी सुद्धा सकाळी कुसुमाग्रज निवासस्थानापासून ते आता संमेलनस्थळी दाखल झाली आहे. आणि मोठ्या जल्लोष जोश आणि उत्साह पूर्वक वातावरणात संमेलनाला सुरुवात झाली आहे. परंतु मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरीमुळे साहित्य संमेलनावर काहीसे पावसाचे गडद सावट होते, पण आज सकाळपासूनच सूर्यदेवाने आपले दर्शन दिल्यामुळे लख्ख प्रकाश पडला आहे ढगाळ वातावरण सुद्धा गायब झाले असून नाशिककरांना चार दिवसानंतर आज सूर्याचे दर्शन झाले आहे.

    दरम्यान सोमवारी आणि मंगळवारी नाशिकमध्ये ढगाळ वातावरण होते तर बुधवारी आणि गुरुवारी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती, दुसरीकदे थंडी कमालीचा गारवा आणि पाऊस यामुळे नाशिकमध्ये कमालीचे पावसाळामय आणि गारव्याचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच बुधवारी पडलेल्या पावसामुळे संमेलन मुख्य मंडपातील बसण्याची जागा ओली झाले होते तसेच खाली अंथरुणात आलेली ताडपत्री व कापड पूर्णता भिजले होते, परंतु गुरुवारी पावसाने उसंत घेतल्यामुळे सभामंडपातील ताडपत्री आणि अंथरलेले कापड आता पूर्णता सुकले आहे.

    हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बुधवार आणि गुरुवारी पावसाची शक्यता नाशिकमध्ये वर्तवण्यात आले होते पण शुक्रवारी पाऊस पडणार नाही असा हवामान खात्याने म्हटलं होतं, त्याचाच कुठेतरी आता , प्रत्यय येताना दिसतोय त्यामुळे आज चार दिवसानंतर नाशिककरांना सूर्यदेवाचे दर्शन झाले आहे. आणि पाऊस सुद्धा गायब झाला आहे त्यामुळे समस्त साहित्य रसिकानी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.