शिवनेरीनंतर आता किल्ले सिंहगडावरही प्लास्टिक बंदी; पाच जूनपासून होणार अंमलबजावणी

जुन्नर वन विभागाने किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक बंदी लागू केली. त्यानंतर आता किल्ले सिंहगडावरही ५ जूनपासून प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. तसे नियोजनही वन विभागाने सुरू केले आहे. त्यानंतर वन विभागाने सिंहगडावरही लास्टिक बंदी करण्यासाठी पावले उचलली आहेत.

    पुणे : जुन्नर वन विभागाने किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक बंदी लागू केली. त्यानंतर आता किल्ले सिंहगडावरही ५ जूनपासून प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. तसे नियोजनही वन विभागाने सुरू केले आहे. त्यानंतर वन विभागाने सिंहगडावरही लास्टिक बंदी करण्यासाठी पावले उचलली आहेत.

    गडकिल्ल्यांवर पर्यटक मोठ्या प्रमाणावर फिरायला जातात. सिंहगड तर पुणेकरांचा खास किल्ला आहे. शनिवार-रविवार तिथे प्रचंड गर्दी होते. तसेच, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्याही पाहायला मिळतात. हा कचरा इतरत्र पडल्याने गडाचे पावित्र्य धोक्यात येते. त्यावर आता वन विभाग योग्य पावले उचलण्याचे नियोजन करत आहे. शिवनेरी किल्ल्यावर पहिल्यांदा प्लास्टिक बंदी लागू झाली. तिथे गेल्या आठवड्यापासून त्याचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तिथे हा निर्णय लागू होण्यापूर्वी गडावर शुद्ध पाण्याची सोय केली होती. त्यामुळे त्यांना निर्णय घेतल्यानंतर कसलाही त्रास झाला नाही.

    आता सिंहगडावरही पुरेशा शुद्ध पाण्याची सोय करणे अपेक्षित आहे. त्यानंतरच असा निर्णय घेणे योग्य ठरणार आहे. त्याबाबतीत वन विभागाने नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे पुणेकरांनीही आता गडावर जाताना सोबत प्लास्टिकची बाटली न ठेवता स्टीलची ठेवावी किंवा गडावरील पाण्यावर आपली तहान भागवावी. कारण पायथ्यावरच ५ जूनपासून प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू होणार आहे.