कर्मचारी झोपा काढतात काय? अजित पवारांचा सभागृहात सवाल, अधिवेशनात ‘या’ कारणामुळे व्यक्त केला संताप

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Angry In Winter Session) यांनी पाच दिवसाच्या अधिवेशनात आमदारांना प्रश्नपत्रिका मिळू नयेत याबाबत रोष व्यक्त करीत कर्मचारी झोपा काढतात काय ? असा सवाल उपस्थित केला.

    मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) दुसऱ्या दिवशी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभेत सोशल डिस्टन्सिंगमुळे सदस्यांना अंतर ठेवून बसावे लागत आहे. काही सदस्य प्रेक्षकांच्या गॅलरीत पहिल्या मजल्यावर बसले आहेत. या सदस्यांना प्रश्नोत्तराच्या पत्रिका न मिळाल्याने आमदार किशोर जोरगिरवार यांनी अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली. मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली.

    कर्मचारी झोपा काढतात काय?
    घडलेल्या सगळ्या प्रकारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Angry In Winter Session) यांनीही पाच दिवसाच्या अधिवेशनात आमदारांना प्रश्नपत्रिका मिळू नयेत याबाबत रोष व्यक्त करीत कर्मचारी झोपा काढतात काय ? असा सवाल उपस्थित केला. तसेच सोमवारपासून प्रेक्षक गॅलरीतील सदस्यांना सभागृहात बसता येईल अशी व्यवस्था करावी अशी विनंतीही केली.

    राज्य विधिमंडळाचे हिवाळी सत्राचे कामकाज २८ तारखेपर्यंत चालणार
    राज्य विधिमंडळाचे हिवाळी सत्राचे कामकाज २८ तारखेपर्यंत चालणार असल्याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र विरोधी पक्षांकडून किमान दोन दिवसांचे कामकाज वाढविण्यबाबत आग्रह होता. सरकार पक्षाकडून मात्र कोरोनाच्या स्थितीचा हवाला देत नियोजित २८ तारखेपर्यंतच हे सत्र पूर्ण करण्याबाबत निश्चयी भुमिका घेण्यात आली. त्यावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.