
ऑटीझम (स्वमग्नता) झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. शहरी भागात काही प्रमाणात यावर उपचार मिळत आहेत, मात्र ग्रामीण भागात या आजारांवर उपचार मिळत नाहीत. या आजाराचे लवकर निदान झाले तर त्यावर उपचार करणे सोपे जाते. त्यासाठी प्रत्येक जिल्हा पातळीवर ऑटीझम सेंटरची निर्मिती करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली.
नागपूर: ऑटीझम (Autism) हा आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मतीमंद मुले आणि स्वमग्न मुले या दोन्हीमध्ये खूप तफावत आहे. स्वमग्न मुलांना सगळे उपचार एकत्र मिळण्याची आवश्यकता असते. त्यामुळे ऑटीझमच्या रुग्णांना जिल्हा पातळीवर तातडीने निदान आणि उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक ऑटीझम सेंटर सुरु करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
ऑटीझम (स्वमग्नता) झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. शहरी भागात काही प्रमाणात यावर उपचार मिळत आहेत, मात्र ग्रामीण भागात या आजारांवर उपचार मिळत नाहीत. या आजाराचे लवकर निदान झाले तर त्यावर उपचार करणे सोपे जाते. त्यासाठी प्रत्येक जिल्हा पातळीवर ऑटीझम सेंटरची निर्मिती करण्यात यावी. महाविकास आघाडी सरकार असताना प्रत्येक जिल्ह्यात ऑटीझम सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्येक जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी अशी सेंटर झाली तर लवकर ऑटीझमग्रस्त मुलांवर तातडीने उपाचार होतील. त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या किमान जिल्ह्याच्या ठिकाणी सेंटर्स उभारण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. दरम्यान या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.
ऑटीझम म्हणजे काय
ऑटिझम हा बालपणात मज्जातंतूंच्या विकासाशी (न्युरो डेव्हलपमेंट) संबंधित विकार आहे. मेंदूतील काही भागांच्या अकार्यक्षमतेमुळे या मुलांची मानसकि क्षमता विकसित होत नाही. यामुळे अर्थबोध, विचार करण्याची क्षमता, वाचा, संवाद साधणे व वागणे यात समस्या निर्माण होतात. ही मुले इतर मुलांसारखी दिसत असली, तरी त्यांचे दैनंदिन जीवन इतरांसारखे नसते. ऑटिझमग्रस्त मुलांच्या काही समस्या वेगळ्या असतात. त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. त्यांना लवकरात लवकर उपचार मिळण्याची गरज असते. त्यामुळे जिल्हापातळीवर त्यांना योग्य उपचार मिळायला हवे.