Ajit Pawar's challenge to bring no-confidence motion against government if opposition has objections; Chief Minister's Dandi to the Press Conference

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गैरहजेरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यानी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधीपक्षांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करतानाच अजित पवार यानी विरोधकांना आक्षेप असेल तर त्यांनी सरकारवर अविश्वास ठराव आणावा असे आव्हान दिले(Ajit Pawar's challenge to bring no-confidence motion against government if opposition has objections; Chief Minister's Dandi to the Press Conference).

  मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गैरहजेरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यानी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधीपक्षांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करतानाच अजित पवार यानी विरोधकांना आक्षेप असेल तर त्यांनी सरकारवर अविश्वास ठराव आणावा असे आव्हान दिले(Ajit Pawar’s challenge to bring no-confidence motion against government if opposition has objections; Chief Minister’s Dandi to the Press Conference).

  पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक

  सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्याना विमान पर्वसा शक्य नसल्याने हिवाळी अधिवेशन मुंबइत घेतले जात आहे मात्र पुढच्या अधिवेशनात प्राधान्याने नागपूरचा विचार केला जाणार असल्याचे मान्य करण्यात आले आहे. राज्यात कमी कालावधीचे अधिवेशन झाल्याबाबत विरोधकांनी टिका केली तरी अन्य राज्यातही कमी कालावधीची अधिवेशने झाली आहेत. गर्दी कमी करण्यासाठी आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर ही व्यवस्था करावी लागल्याचे ते म्हणाले. मात्र शुक्रवारी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असल्याचे ते म्हणाले.

  सर्व प्रश्नाची उत्तरे देण्यास सक्षम

  राज्य सरकार विरोधकांच्या सर्व प्रश्नाची उत्तरे देण्यास सक्षम असल्याचे सांगत पवार म्हणाले की, औबीसीचा मुद्दा आता अन्य राज्यातही सुरू झाला आहे. तर वीज बिलांसह परिक्षा घोटाळा प्रकरणात सरकार निपक्ष चौकशी करत असल्याने सीबी आय चौकशीची गरज नसल्याचे ते म्हणाले.

  पाच प्रलंबित विधेयकांसह एकूण २६ विधेयके

  या अधिवेशनात पूर्वीच्या पाच प्रलंबित विधेयकांसह एकूण २६ विधेयके चर्चेला येणार आहेत. त्यात शक्ति कायद्यासह तीन कृषी विधेयके आणि कुलपतीच्या अधिकाराबाबतचे विधयेक आहे असे पवार म्हणाले. ते म्हणाले की राज्यात कुलपतीचे अधिकार कमी केल्याबाबत जी टिका केली जात आहे ती दिशाभुल असून राज्य सरकारने अश्या प्रकारे राज्यपालांचे अधिकार कमी करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.
  राज्यातील एसटी कर्मचा-यांना सहानुभुतीने संयमाने कामावर येण्याचे आवाहन सरकार करत आहे मात्र नाईलाजास्तव मेस्मा सारखा निर्णय घेण्यास त्यानी सरकारला भाग पाडू नये अशी आमची भुमिका आहे असे पवार म्हणाले.

  सोयीनुसार मुख्यमंत्री विधानभवनात येणार

  मुख्यमंत्र्यांची सध्या प्रकृती व्यवस्थित असून त्यांच्या सोयीनुसार ते विधानभवनात येणार आहेत मात्र ते सर्व बैठकाना व्हिसीतून हजेरी लावत आहेत. अशी माहिती  अजित पवार यानी दिली. ते म्हणाले की, उद्या मुख्यमंत्र्यानी सत्ताधारी आमदारांची बैठक बोलावली असून त्यात रणनीती ठरणार आहे. सत्ताधारी पक्षाकडे १७० सदस्यांचे पाठबळ नाही असे विरोधकांना वाट त असेल तर ते अविश्वास ठराव आणू शकतात असेही पवार म्हणाले.