मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांची ‘ही’ टीका

कॅबिनेटमध्ये या दोघांची बैठक चालू असताना 45 खुर्च्या यांच्याकडे पाहत असतात, त्यामुळे त्याचा ताणही या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे असतो असंही त्यांनी सांगितले.

    गेल्या अनेक दिवसापासून मंत्रीमंडळ (Cabinet Expansion)  विस्ताराबाबत चर्चा सुरु आहे. शिंदे सरकार सत्तेत येऊन अनेक दिवस झाले असून अद्याप मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)  यांनी टिका केली आहे. बंडखोरी नाट्यानंतर शिंदे गटातील सर्वच आमदारांना मंत्रिमपदाची ऑफर देण्यात आली, त्यानंतर आता मंत्रिपद नेमकं द्यायचे कोणाल असा प्रश्न असल्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबत आहे असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

    शिवसेनेत बंडखोरी झाली त्यावेळी अनेकांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली, त्यावेळी प्रत्येक आमदारालाही आपण मंत्री होऊ असं वाटत असल्यानेच मंत्रिमंडळ विस्तार रखडले असल्याचे सांगितले. राज्यात सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तरीही अजून मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही त्यामुळे राज्यातील विकास कामं रखडले असल्याचेही त्यांनी सांगितले. कॅबिनेटमध्ये या दोघांची बैठक चालू असताना 45 खुर्च्या यांच्याकडे पाहत असतात, त्यामुळे त्याचा ताणही या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे असतो असंही त्यांनी सांगितले.