कोरोना लसीचा दुसरा डोस न घेतलेल्यांना अजित पवारांचा इशारा, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यावेळी पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात काही नागरिक लस घेण्यास उत्सुक नसल्याचं लक्षात आलं आहे. यावर काही दिवसांपूर्वीच पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी धोरण आखण्याचे निर्देश दिले होते. मात्र तरीही इंदापूर, बारामती या भागात नागरिक लस घेत नाहीत.अजित पवार यांच्या कानावर ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी मात्र अशा नागरिकांवर कडक कारवाई करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.

    पुणे : कोरोना माहामारीशी लढण्यासाठी आपल्या हातात सध्या एकच शस्त्र आहे. लसीकरण हेच आपल्याला सध्यातरी कोरोनावरील उपाय म्हणून अवलंबवा लागत आहे. परिणामी सध्या सर्वत्र लसीकरणावर भर देण्यात येत आहे.

    दरम्यान अशातच गेल्या काही दिवसांमध्ये लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता नसल्याचं दिसत होतं. अशात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लस न घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

    राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यावेळी पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात काही नागरिक लस घेण्यास उत्सुक नसल्याचं लक्षात आलं आहे. यावर काही दिवसांपूर्वीच पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी धोरण आखण्याचे निर्देश दिले होते. मात्र तरीही इंदापूर, बारामती या भागात नागरिक लस घेत नाहीत.

    अजित पवार नेमकं काय म्हणाले? 

    अजित पवार यांच्या कानावर ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी मात्र अशा नागरिकांवर कडक कारवाई करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा विचार करावा लागेल असं अजित पवार म्हणाले आहेत. पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी 100 टक्के लसीकरण झालं आहे. पण अद्यापही ग्रामीण भागात परिस्थिती वेगळी आहे.