ST कर्मचाऱ्यांच्या संपावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान सरकारनं नेमलेली समिती न्यायालयासोमर अहवाल सादर करणार असून, एसटी कर्मचाऱ्यांची समीती देखील सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे. संप मोडून काढण्यासाठी एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांचे निलंबन, सेवासमाप्ती, बडतर्फीची कारवाई केली. तर वेतनवाढही दिली. याशिवाय मेस्मा लावण्याचा इशाराही दिला.

    राज्यातील एसटी कर्मचारी संपाचा तिढा अद्यापही कायम आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम असून, दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान सरकारनं नेमलेली समिती न्यायालयासोमर अहवाल सादर करणार असून, एसटी कर्मचाऱ्यांची समीती देखील हायकोर्टात आपली बाजू मांडणार आहे.

    संप मोडून काढण्यासाठी एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांचे निलंबन, सेवासमाप्ती, बडतर्फीची कारवाई केली. तर वेतनवाढही दिली. याशिवाय मेस्मा लावण्याचा इशाराही दिला. तर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून खासगी प्रवासी वाहतुकीमार्फत सेवा देण्यास सुरुवात केली. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही.

    विलीनीकरणाच्या प्रश्नावर न्यायालयाने समिती नेमली आहे. त्याला बारा आठवड्यांची मुदत दिली असून २० डिसेंबरला प्राथमिक अहवालही मागितला आहे. त्यामुळे २० डिसेंबरला विलीनीकरणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्याकडेच कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे. समितीकडून प्राथमिक अहवाल सादर केला जाईल. तर एसटी महामंडळही आपली भूमिका मांडेल. त्यामुळे सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असून त्यानंतरच कर्मचाऱ्यांच्या संपाची पुढील भूमिका ठरणार आहे.

    महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी संपाची नोटीस दिल्यानंतर राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण संप कालावधीत अजय गुजर आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या माध्यमांशी संयुक्तरित्या चर्चा झाल्या.