तालुक्यातील सर्व निवडणुका एकत्रित लढवणार : भानुदास मुरकुटे

श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासाठी यापुढील सर्व निवडणूका जे येतील त्यांना बरोबर घेऊन एकत्रित लढवणार असल्याची घोषणा माजी आमदार भानुदास मुरकुटे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. 

  श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासाठी यापुढील सर्व निवडणूका जे येतील त्यांना बरोबर घेऊन एकत्रित लढवणार असल्याची घोषणा माजी आमदार भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
  जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले मूरकुटे व ससाणे यांची युती झाली आहे. आता अशोक कारखाना निवडणूक जाहीर झाल्यानंतर ससाणे गट काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. तालुक्याची संभ्रमावस्था दूर करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी माजी आमदार भानुदास मुरकुटे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. माजी नगराध्यक्ष संजय फंड यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदत ते बोलत होते.
  यावेळी साई संस्थान विश्वस्त सचिन गुजर,संजय फंड,श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारे, मनोज लबडे, रितेश काटे, मुजफ्फर शेख, सुधीर नवले, राजेंद्र पाउलबुद्धे, नीरज मूरकुटे, संकेत संचेती, दिलीप नागरे, बाबासाहेब दिघे, किरण परदेशी, शशांक रासकर, भास्कर लिपटे, राजेंद्र पावलबुद्धे, सुनील नवले, भाऊसाहेब कांदळकर, अशोक पवार आदींसह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
  यावेळी बोलताना माजी आमदार मूरकुटे म्हणाले, श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासाठी आपल्या गटाची लोकविकास आघाडी व काँग्रेस यापुढील नगरपालिका, जिल्हा परिषद, बाजार समिती, मुळाप्रवरासह सर्व निवडणुका एकत्रित लढवणार आहोत. जिल्हा बँक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण श्रीरामपूर मतदारसंघात जिल्हा बँकेत आपण व करण ससाणे बिनविरोध निवडून आलो. त्यावेळी दादा म्हणाले, तुम्ही शिर्डी मतदारसंघासाठी तयारी करा. परंतु, आपली दक्षिण लोकसभा लढवण्याची तयारी असल्याचे सांगितले होते. राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व दिलीप वळसे पाटिल व जयंत पाटील यांचेशी चांगले संबंध आहेत.
  आपल्या सांगण्यावरूनच कारखान्याचे संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतरही कायदा बदलल्याने आम्ही राहू शकलो. आम्ही राहू नये. काहींनी न्यायालयात केस दाखल केली होती.मात्र वरची मंडळी आपलयासोबत होते.येत्या दोन वर्षात पाण्याचे चित्र बदलणार आहे.निळवंडे मुळे आपनास तोटा होणार आहे.पाणीवाटप कायद्यामुळे पाऊस कमी झाल्यास भांडरदर्यातून दोन टीएमसी पाणी जयकवाडीला जाणार आहे.ऊस व शेती धंदा अडचणीत येणार आहे.
  विखेंबाबत बोलताना सांगितले ते सोबत आल्यास बरोबर घेऊ. कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ज्याप्रमाणे संगमनेर प्रवरा ज्ञानेश्वर मुळा वृद्धेश्वर या कारखान्याच्या निवडणूक बिनविरोध झाली. तशी अशोकची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असून सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाऊ.
  उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले, नामदार बाळासाहेब थोरात व आमदार लहुजी कानडे यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार कानडे मुंबईला गेल्या मूळ उपस्थित राहू शकेल नाही. तालुकाच्या विकासासाठी मुरकुटे यांच्याशी युती करण्याचा निर्णय प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. अशोक बरोबरच मूळ प्रवरा, नगर पालिका, जिल्हा परिषद, बाजार समिती, पंचायत समिती निवडणूक एकत्र लढवणार असल्याचे सांगितले.
  प्रास्तविक सचिन गुजर यांनी केले ते म्हणाले शहराच्या आणि तालुक्याचा विकास साठी एकत्र आलो आहोत भविष्यात भंडारदरा पाणी प्रश्न बिकट होणार आहे .यासाठी एकत्र असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.