अनिल देशमुखांनी वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोप; सचिन वाझेने जबाबात दिली अत्यंत महत्वाची माहिती

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पैशांसाठी कोणतीही मागणी केली नव्हती. तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारे पैसे स्वीकारले नाहीत, असा जबाब बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेने चांदिवाल आयोगासमोर दिला. देशमुख आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी यांनी कधीही आपल्याला पैसे गोळा करायला सांगितले नाही, असे वाझे म्हणाला(Allegations that Anil Deshmukh set recovery targets; Sachin Waze gave very important information in reply).

    मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पैशांसाठी कोणतीही मागणी केली नव्हती. तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारे पैसे स्वीकारले नाहीत, असा जबाब बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेने चांदिवाल आयोगासमोर दिला. देशमुख आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी यांनी कधीही आपल्याला पैसे गोळा करायला सांगितले नाही, असे वाझे म्हणाला(Allegations that Anil Deshmukh set recovery targets; Sachin Waze gave very important information in reply).

    आयोगासमोर देशमुख यांच्यातर्फे अॅडव्होकेट गिरीश कुलकर्णी यांनी बाजू मांडली. त्यांनी सचिन वाझेची उलटतपासणी केली. वाझे साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं राहून प्रश्नांना उत्तर देत होता. तर देशमुख हे गिरीश कुलकर्णी यांच्या मागे बसले होते. आता चांदिवाल आयोगाने पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी ठेवली आहे.

    निलंबनाच्या काळातही तपास

    निलंबनाच्या काळातही अनेक प्रकरणांचा तपास केल्याची कबुली वाझेने उलटतपासणीवेळी दिली. निलंबन काळात मुंबई पोलिस मुख्यालयाशी संलग्न होतो; पण जणू काही मी सेवेत आहे, अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या तपासात माझी मदत घेतली जात होती. घटनास्थळाचे पंचनामे करणे, संबंधितांचे जबाब नोंदविणे, साक्षीदार, संशयित यांचा तपास करणे ही कामे करत असतानाच पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या वेळी रायगड पोलिसांनी माझी मदत घेतली होती. तसे मुंबई सहपोलिस आयुक्तांच्या निर्देशांवरून केले होते, असेही वाझेने स्पष्ट केले होते.

    आरोपांचा निकाल लवकरच?

    याप्रकरणात अनिल देशमुख यांच्यावरील आरोप निकालात निघण्याची शक्यता वाढली आहे. याप्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांचे खासगी सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांनाही अटक केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही आपल्या पत्रात या दोघांच्या माध्यमातून खंडणी गोळा केली जात असल्याचा आरोप केला होता.

    ईडीने केला होता दावा

    ईडीने याआधी हा दावा केला होता की वाझे हा अनिल देशमुखांसाठी कोट्यवधींची वसुली करत होता. दरम्यान मार्च महिन्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी हा उल्लेख केला होता की सचिन वाझेला 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते.