अमित शहांचा मुक्काम अजित पवारांच्या ‘सूट’मध्ये; रुपाली पाटील म्हणाल्या…

  पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था झाली नव्हती, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळताच त्यांनी त्यांचा राखीव सूट अमित शहा यांना दिला. अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करत दिली आहे.

  तसेच यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संसकृतीचे दर्शन दिले. हे शरद पवारांचे संस्कार आहेत. असेही रुपाली ठोंबरे यांनी ट्विट करुन म्हणाल्या आहेत.

  केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा पुणे दौरा

  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १८ आणि १९ डिसेंबर या दोन दिवशीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. १८ रोजी त्यांनी शिर्डी येथील साई मंदीरात दर्शन घेतले. १९ रोजी ते पुण्यात असून विविध विकास कामांच्या उद्घाटनासह सहकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहे.

  रुपाली पाटील ठोंबरे यांचा सवाल? 

  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी पुणे भाजपाने वर्तमानपत्रात एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या तुलनेत अमित शहा यांचा फोटो मोठा छापण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ”सांगा मोठं कोण…? अमित शहा साहेब, की… छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.” असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी केला आहे.