१०१ रोगांचा कर्दनकाळ आहे आवळा; जाणून घ्या आवळ्याचे फायदे

आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.

  आवळा हे प्रसिद्ध आणि सर्वात जुने आयुर्वेदिक औषध आहे. जगभरात या फळाला इंडियन गुझबेरी म्हणून ओळखतात. आयुर्वेदिक वैद्यांचे म्हणणे आहे की आवळा हे एन्टी ऑक्सिडेंटल आणि पोषणाचे सर्वात प्रचुर स्त्रोत आहे. वास्तविक आवळा अर्थात आमलकीचा अर्थ ‘आई ‘आणि ‘सांभाळणे ‘असा आहे.

  जो त्याच्या उपचारात्मक आणि स्न्गोपानात्म्का गुणधर्माची ओळख करून देते. महान आयुर्वेदिक ग्रंथ चरक संहिता आणि शुश्रुत संहिता यांनी त्याला पुनरुजीवक वनस्पती म्हणले आहे.

  आवळ्याचे पोषक गुण: आवळ्यामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात असते. सी विटामिनच्या नैसर्गिक स्त्रोतांपैकी आवळा हा सर्वोत्तम स्त्रोत आहे. आवळ्यातील टॅनीक त्यातील सी विटामिनला फळावर विविध प्रक्रिया केल्यानंतर देखील स्थिर ठेवतात.

  कॅलशियम ,फाॅस्फारस आणि लोहासारख्या खाजीन्यांचे उत्तम स्त्रोत म्हणून आवळा ओळखला जातो. हे हाडे निरोगी आणि दात मजबूत ठेवण्यासाठी मदत करत असतात.

  आवळ्या असणारे कॅरोटीन आणि विटामिन ए दृष्टी आणि केसांच्या वाढीसाठी खुप लाभदायक आहे.
  विटामिन इ आणि बी काम्पलेक्स एन्टी ऑक्सिडट शरीरासाठी फायदेशीर आहेत.

  आवळ्यातील तंतुमय भाग आपल्या पचनसंस्थेचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी मदत करत असतो.

  आवळ्याला लिव्हर टॉनिक मानले जाते. नियमितपणे आवळा घेतल्याने शरीरातील सर्व वि षारी पदार्थ निघून जातात.

  त्याच्या मधील पुनरज्जीवक आणि पोषक गुणधर्म शरीरातील रक्त केशिकाना बळकट बनवतात.

  आरोग्यदायी आवळा: डोकं शांत राहतं. तसंच केसांच्या तक्रारीही दूर होतात. केस गळत असतील तर आवळ्याच्या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करावी.
  ज्यांना पित्ताचा त्रा स आहे त्यांनी सकाळी ‘मोरावळा’ खाल्ल्यास फा यदेशीर ठरेल.

  लघवी साफ न होणे, आम्लपित्त, चक्कर येणे, पोट साफ न होणे अशा अनेक तक्रारींवर आवळा अत्यंत गुणकारी आहे.

  नियमितपणे आवळा खाल्ल्यास किंवा आवळ्याच्या रसाचं सेवन केल्यास शरीरातील र क्ताभिसरणाचे कार्य सुरळीत होतं.

  आवळ्यामुळे स्मरणशक्ती चांगली होते. त्यामुळे लहान मुलांना आवळा द्यावा.
  आवळ्यात ‘क’ जी वनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा उत्तम औषध आहे.

  आवळ्याचा रस खडीसाखरेबरोबर दिला असता डोकेदुखी, पोट, छाती व गळ्यातील आग, चक्कर तसेच अम्लपित्तामुळे होणारी उलटी व इतर लक्षणे कमी होतात.