कापसाच्या पिकांवर यंदाही बोंडअळीचं सावट; शेतकरी चिंतेत

पश्चिम विदर्भात सोयाबीननंतर सर्वाधिक कापसाचं उत्पादन घेतलं जातं. कापूस हे खरीपातील पीक आहे, परंतु याच पांढऱ्या कापसामध्ये आता शेतकऱ्यांची स्वप्न काळवंड होताना दिसत आहे. यंदा कापसाला चांगला भाव आहे.

    अमरावती (Amravati) :  दरवर्षी अत्यंत कमी दराने विकला जाणारा कापूस आता साडे आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलाय.शेतकऱ्यांना चांगला भाव मिळालाय असं चित्र सगळीकडे झालंय. पण तशी परिस्थिती नाही. चांगला भाव मिळत असला तरी बोंडअळीने उत्पादनात मात्र घट झाली आहे.

    पश्चिम विदर्भात सोयाबीननंतर सर्वाधिक कापसाचं उत्पादन घेतलं जातं. कापूस हे खरीपातील पीक आहे, परंतु याच पांढऱ्या कापसामध्ये आता शेतकऱ्यांची स्वप्न काळवंड होताना दिसत आहे. यंदा कापसाला चांगला भाव आहे. त्यामुळे यंदा दोन पैसे जास्त मिळतील या आशेने शेतकऱ्यांनी खर्चही जास्त केला. पण मागील वर्षीप्रमाणेच यंदाही बोंडअळी आली आणि हातात आलेले पीक निघून गेलं.