म्हाडा भरतीप्रमाणेच ऐनवेळी अमरावती जिल्हा परिषदेच्या मुलाखती रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप

अमरावती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग अमरावती अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज 22 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागविण्यात आलेला होते. तसेच 23 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 4 वा. मुलाखती करिता उमेदवारांना बोलावण्यात आले होते.

    अमरावती (Amravati) : राज्यात सध्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटीमुळे विविध परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. नुकतीच म्हाडा मधील परीक्षा भरती पेपरच्या आदल्या दिवशी रात्री दोन वाजता रद्द करण्यात आली होती. अशाच प्रकारे ऐन मुलाखतीच्या दिवशी अमरावती जिल्हा परिषदेची (Amravati ZP interviews postpones) भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याच्या माहितीने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

    अमरावती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग अमरावती अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज 22 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागविण्यात आलेला होते. तसेच 23 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 4 वा. मुलाखती करिता उमेदवारांना बोलावण्यात आले होते.

    मात्र ही परीक्षा मुलाखतीच्या दिवशी म्हणजेच आज 23 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मुलाखत प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी कैलास घोडकी यांनी दिल्याने विद्यार्थ्यांची ऐन वेळेवर तारांबळ उडाली आहे. यातील अनेक विद्यार्थी बाहेर गावावरून आल्याचे सुद्धा समजते.

    याबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ सोबत बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडकी म्हणाले की, ‘काही तांत्रिक अडचणीमुळे 23 डिसेंबर 2021 रोजी आयोजित मुलाखती पुढील दिनांकापर्यंत पुढे ढकलली आहे. मुलाखतीची तारीख आणि वेळ लवकरच करण्यात येईल’.