मोबाईलमधील ऑडिओ क्लिपमुळे मुलीकडून वडिलांच्या हत्येचा उलगडा, आरोपी आईला अटक

वडिलांच्या मृत्यूनतंर मुलगी तीन महिन्यांनी मुलगी आईला भेटायला आली आणि सगळं गुपित उघड झालं. काही कामनिमीत्त श्वेताने आईचा मोबाइल घेतला असता त्यात तिला ऑडिओ क्लिप सापडली आणि धक्काच बसला.

  चंद्रपूर : वडिलांच्या हत्येनतंर मुलीला आईच्या मोबाईमध्ये असं काही आढळलं ज्यामुळे वडिलांच्या हत्येचा उलगडा झाला. हे ऐकूण एखाद्या क्राईम वेबसरीजमधील दृश्य असल्याचं आपल्याला वाटू शकतं. मात्र असं घडलयं चंद्रपुरात. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीला आईच्या मोबाईलमधील ऑडिओ क्लिप आढळली.  आईनंच वडिलांचा खून केल्याची बाब या क्लिपच्या माध्यमातून  समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. रंजना रामटेके या महिलेचं नाव आहे.

  तीन महिन्यापूर्वी एका व्यक्तीचा ह्रदयविकाराचा झटका आल्याने  मृत्यू झाला होता. त्याच्य पत्नीने  ह्रदयविकाराचा झटका आल्याने पतीचा मृत्यू झाल्याचं आपल्या मुलीसह सर्व नातेवाईकांना सांगितलं होतं. पण तीन महिन्यांनी मुलीला आईच्या मोबाईलमध्ये ऑडिओ क्लिप सापडली. यामध्ये महिला आणि तिच्या प्रियकराचं संभाषण समोर आलं आहे. ज्यामध्ये महिलेने आपल्या पतिच्या खून केल्याबद्दल सांगितलं आहे.  या प्रकरणी मुलीच्या तक्रारीनतंर पोलिसांनी तीन महिन्यांनी पत्नीला अटक केली आहे.

  कसा केला खून

  रंजना रामटेके या महिलेने  महिलेने निवृत्त सरकारी अधिकारी असणाऱ्या पतीची ६ ऑगस्टला खून केला होता. खून केल्यानंतर तिने आपल्या प्रियकराला फोन करुन हत्येची माहिती दिली होती. हा सगळा संवाद मोबाइलमध्ये रेकॉर्ड झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. “मी उशीच्या सहाय्याने त्यांचा खून केला आहे. मी आता सकाळी नातेवाईकांना फोन करुन मृत्यू झाल्याची माहिती देईल. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगणार आहे,” असं महिला सांगत असल्याचं रेकॉर्ड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी महिलेने ठरल्याप्रमाणे नातेवाईकांना फोन करुन खोटी बतावणी केली. कोणालाही संशय न आल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले असं पोलिसांनी सांगितलं आहे.

  मुलीनं आईचा फोन तपासताच सत्य उघ़ड

  वडिलांच्या मृत्यूनतंर मुलगी तीन महिन्यांनी मुलगी आईला भेटायला आली आणि सगळं गुपित उघड झालं. काही कामनिमीत्त श्वेताने आईचा मोबाइल घेतला असता त्यात तिला ऑडिओ क्लिप सापडली आणि धक्काच बसला. फोन मधील ऑडिओ रेकॉर्डिग एकल्यानंतर तिला धक्का बसला. त्यानंतर तिने पोलिसांना याबददल पोलिसांना सांगितलं. दरम्यान पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतला असता तिने पतिचा खून केल्याची बाब कबूल केली.