file photo
file photo

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचं प्री वेडिंग कार्ड काही दिवसांपूर्वी व्हायरल झालं आहे. वेडिंग कार्डनुसार, 1 ते 3 मार्चदरम्यान अनंत आणि राधिका यांचा लग्नसोहळा चालणार आहे.

  राधिका मर्चंट (Radhika Merchant) आणि अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी वर्षभरापुर्वी कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत साखरपुडा (Ring Ceremony) केला होता. आता राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे.

  १९ जानेवारी २०२३ रोजी मुंबईतील अंबानींच्या अँटिलिया घरी (Ambani’s Mumbai Home Antilia)  राधिका मर्चंट आणि अनंतचा साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला सिनेसृष्टीसह अनेक क्षेत्रातील मान्यवर लोकांनी हजेरी लावली होती. तेव्हापासून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रतिक्षा होती. आता लवकरच त्यांच्या घरी सनई  चौघडे वाजणार असून ते विवाह बंधनात अडकणार आहेत. सध्या लगन लखवानु या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शला सुरुवात झाली आहे. नुकतचं गुजरात येथील जामनगरमध्ये अनंत आणि राधिका यांचा लगन लखवानु हा कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

  लगन लखवानु या कार्यक्रमादरम्यान राधिका मर्चेंटने डिझायनर अनामिका खन्नाने डिझाईन केलेला लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यावरील फ्लोरल वर्क चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. या लूकमध्ये राधिका खूपच एलीगेंट दिसत होती. लेहेंग्यावर तिने हिऱ्याचा हार घातला होता. तिची लाल रंगाची टिकलीदेखील खूपच लक्षवेधी होती. कोणतीही भारी हेअरस्टाईल करण्यापेक्षा राधिकाने मोकळे केस ठेवायला पसंती दर्शवली. तसेच सटल मेकअपमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत होती.

  ‘या’ दिवशी अनंत आणि राधिकाचं लग्न

  अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचं प्री वेडिंग कार्ड काही दिवसांपूर्वी व्हायरल झालं आहे. वेडिंग कार्डनुसार, 1 ते 3 मार्चदरम्यान अनंत आणि राधिका यांचा लग्नसोहळा चालणार आहे. या लग्नसोहळ्याला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. गुजरात येथील जामनगरमध्ये जुलैमध्ये ते लग्नबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. अद्याप अंबानी कुटुंबियांकडून यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.