
कर्जात बुडालेली अनिल अंबानी यांची कंपनी रिलायंस नेव्हल अँड इंजिनीअरिंग लिमिटेड (आरएनईएल) आता मुंबईचे उद्योजक निखील वी. मर्चेंट यांची झाली आहे. लिलाव प्रक्रियेत मर्चेंट यांनी सर्वात मोठी बोली लावून कंपनीच्या अधिग्रहण स्पर्धेत आघाडी घेतली(Anil Ambani sells debt-ridden company).
दिल्ली : कर्जात बुडालेली अनिल अंबानी यांची कंपनी रिलायंस नेव्हल अँड इंजिनीअरिंग लिमिटेड (आरएनईएल) आता मुंबईचे उद्योजक निखील वी. मर्चेंट यांची झाली आहे. लिलाव प्रक्रियेत मर्चेंट यांनी सर्वात मोठी बोली लावून कंपनीच्या अधिग्रहण स्पर्धेत आघाडी घेतली(Anil Ambani sells debt-ridden company).
आरएनईएल कंपनीला पिपावाव शिपयार्ड या नावाने ओळखले जाते. मर्चेंट आणि त्यांची भागीदार कंपनी कंसोर्टियम हेजल मर्केंटाईल प्रा. लिमिटेडने तिसऱ्या फेरीत सर्वाधिक बोली लावली. कमिटी ऑफ क्रेडिटर्सने (सीओसी) गेल्या महिन्यात या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंपन्यांची चर्छा करून उच्च प्रस्तावांची मागणी केली होती. त्यानंतर हेजल मर्केंटाइलने शिपयार्डसाठी 2700 कोटी रुपयांची सुधारीत बोली लावली.
आधी ती 2,400 कोटी होती. आयडीबीआय बँक रिलायन्स नेव्हलची लीड बँकर आहे. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी शिपयार्डविरोधात गेल्या वर्षी जानेवारीमध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये (एनसीएलटी) दावा दाखल करण्यात आला होता. रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंगवर सुमारे 12,429 कोटी रुपयांचे कर्ज आहे.