अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकले, याची किंमत आज, उद्या वसूल केल्याशिवाय राहणार नाही, शरद पवारांचा भाजपाला इशारा, सत्ता डोक्यात गेल्याची टीका

दोषारोप झाल्यानंतर अनिल देशमुख आपल्याकडे आले होते, अशी माहितीही पवारांनी दिली आहे. दोष लागल्यामुळे आपण सत्तेत बसणार नसल्याचे देशमुखांनी सांगितल्याचेही पवारांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला, हे घडलं ते एका माजी आाय़ुक्तांमुळे घडले, आता ते आयुक्त कुठे आहेत, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. जनतेला तोंड दाखवण्याची ज्यांची तयारी नाही ते अधिकारी बाहेर आहेत आणि अनिल देशमुख तुरुंगात असल्याचे पवार म्हणाले.

    नागपूर – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh arrest ) यांना जेलमध्ये टाकलं, याची किंमत आज ना उद्या वसूल केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला आहे. पवार चार दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून, नागपुरात ( Vidarbh tour) एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी अनिल देशमुख अटक प्रकरणी भाजपावर निशाणा साधला आहे.
    अशा प्रकारे त्रास देणे, अटक करणे, बदनामी करणे, हे काम केंद्र सरकारकडून करण्यात येते आहे. तुम्ही कितीही छापे मारा, आज ना उद्या ही शक्ती सामान्य माणसांचा पिठांबा घेऊन तुम्हाला कधीही राज्यात सत्तेत येऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
    राज्य दिलदारपणे चालवायाचे असते, सत्तेचा सन्मामाने वापर करायचा सतो, असेही पवार यावेळी म्हणाले. सत्ता आली की पाय जमिनीवर असावे लागतात. मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहत नाहीत आणि सत्ता ज्यांच्या डोक्यात जाते, त्यांच्या हातातून सत्ता गेल्यावर से घडते अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.
    दोषारोप झाल्यानंतर अनिल देशमुख आपल्याकडे आले होते, अशी माहितीही पवारांनी दिली आहे. दोष लागल्यामुळे आपण सत्तेत बसणार नसल्याचे देशमुखांनी सांगितल्याचेही पवारांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला, हे घडलं ते एका माजी आाय़ुक्तांमुळे घडले, आता ते आयुक्त कुठे आहेत, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. जनतेला तोंड दाखवण्याची ज्यांची तयारी नाही ते अधिकारी बाहेर आहेत आणि अनिल देशमुख तुरुंगात असल्याचे पवार म्हणाले.
    राज्यातील विरोधी पक्ष केंद्रातील सत्तेचा गैरवापर करुन, राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असल्याचा आरोपोही त्यंनी यावेळी केला. सत्ता गेल्याने काही जणांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे. त्यातूनच दिल्लीच्या मदतीतून उथलं राज्य कसं घालवता येईल, यासाठी अखंड प्रयत्न सुरु असल्याचे दिसत असल्याचे पवारांनी सांगितले. याचाच क भाग म्हणून सरकारमधील नेत्यांना केंद्रीय संस्थांचा गैरवापर करुन त्यांचा छळवाद सुरु केल्याची टीकाही पवारांनी केली. काही अस्वस्थ मंडळी याद्या करुन दिल्लीला पाठवत आहेत. ज्या एकनाथ खडसेंनी भाजपाचे नेतृत्व केले, त्यांनी पक्ष बदलल्य़ावर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ईडीने चौकशीसाठी बोलावल्याचे पवारांनी सांगितले. याचबरोबर संजय राऊत यांच्या पत्नीलाही चौकशीला बोलावण्यात आले, अजित पवारांविरोधात काही करता येत नाही म्हणून त्यांच्या बहिणींच्या घरी धाडी टाकण्यात आल्याचे पवार म्हणाले. सहन मुश्रीफांनाही या तासाला समोरे जावे लागल्याचे पवारांनी सांगिंतले. यातून केवळ नेत्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.
    राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता त्याचा विचार कधीच सोडणार नाही. जेव्हा संधी मिळेल तेव्हा व्याजासकट या लोकांना अक्कल शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे पवारांनी सांगितले.
    अनिल देशमुखांच्या अनुपस्थितीतही कार्यकर्त्यांचा उत्साह दांगडा आहे. या ठिकाणी असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्याची गरजही पवारांनी सांगितली.