अभिनेत्री अंकिता लोखंडेला पितृशोक; वयाच्या 68 व्या वर्षी शशिकांत लोखंडे यांच निधन

अंकिताचं तिच्या वडिलांसोबत खूप घट्ट नातं होतं. आता वडिलांच्या निधनाने तिला मोठा धक्का बसला आहे

    हिंदी सिनेसृष्टीतील मराठमोठी अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या (Ankita Lokhande Father Dies) वडिलांचं निधन झालं आहे. शशिकांत लोखंडे यांनी वयाच्या  68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसापासून प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी त्यांची प्राणज्योत मालावली.

    अंकिताचं तिच्या वडिलांसोबत खूप घट्ट नातं होतं. आता वडिलांच्या निधनाने तिला मोठा धक्का बसला आहे. ती नेहमी तिच्या कुटुंबियांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. फादर्स डेनिमित्त तिने वडिलांसोबतचा फोटो पोस्ट केला होता. “माझे पहिले हिरो माझे बाबा आहेत. मला तुमच्याबद्दल वाटणाऱ्या भावना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. संघर्षापासून तुम्ही तुमच्या मुलांना दूर ठेवलं आहे. असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं होतं.