चिंता वाढली; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आढळला Omicron चा रुग्ण

मुंबई-पुण्यानंतर नागपूरमध्ये ओमिक्राॅनचा रुग्ण आढळला आहे. नागपूरात ओमियक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. नागपूरमध्ये आढळलेला हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करुन आल्याची माहिती असून याचं वय 40 आहे. सध्या या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे.

    नागपूर : कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. यातच कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटनं तर कहरच केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

    दरम्यान यातच आता ओमिक्राॅनचं सावट डोकं वर काढायला लागलं आहे. कोरोनानंतर आता ओमिक्राॅनच्या रुग्णांमध्येही वाढ होत असलेली पहायला मिळत आहे.

    मुंबई-पुण्यानंतर नागपूरमध्ये ओमिक्राॅनचा रुग्ण आढळला आहे. नागपूरात ओमियक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. नागपूरमध्ये आढळलेला हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करुन आल्याची माहिती असून याचं वय 40 आहे. सध्या या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे. ओमिक्रॉनबाधित रुग्णावर खबरदारी म्हणून खासगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.

    दरम्यान, ओमिक्राॅन व्हेरिएंटचा धोका वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण पूर्ण झालं पाहिजे. राहिलेल्या लसीकरणाला वेग देण्यासाठी आता ठाकरे सरकारनं निर्देश जारी केले आहेत.