
अॅप्पल(Apple Delays Return To Office) या कंपनीने कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुदत मागे घेतली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी १००० अमेरिकन डॉलर्सचा(1000 Dollars Bonus For Work From Home) बोनस जाहीर केला आहे.
कोरोनाचं(Corona) संकट संपेल असं वाटत असताना नव्या व्हेरिएंटची धास्ती वाटू लागली आहे. अशातच अॅप्पल(Apple Delays Return To Office) या कंपनीने कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुदत मागे घेतली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी १००० अमेरिकन डॉलर्सचा(साधारण ७५ हजार रुपये)(1000 Dollars Bonus For Work From Home) बोनस जाहीर केला आहे. अॅप्पलचे सीईओ टिम कुक यांनी आधी सांगितले होते की, ऑक्टोबरमध्ये कर्मचार्यांसाठी कार्यालय उघडले जाईल. नंतर १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढविण्यात आला होता. कंपनीने आठवडाभरापूर्वी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीपर्यंत कामावर येण्यास सांगितले होते. मात्र पुन्हा एकदा ही मुदत वाढवण्यात आली आहे. पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही.
कोरोनाचा उद्रेक पाहता अॅप्पलने तीन रिटेल स्टोअर्स देखील बंद केले आहेत. बंद करण्यात आलेले स्टोअर्स मियामी, मेरीलँड आणि ओटावा येथे आहेत. अॅप्पलने त्यांच्या यूएस स्टोअरमध्ये आता मास्क अनिवार्य केलं आहे. यापूर्वी ग्राहकांसाठी मास्क घालण्याचा आदेश काढून घेण्यात आला होता. मात्र आता पुन्हा हा नियम लागू केला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिकेतील जवळजवळ अर्ध्या अॅप्पल स्टोअरमध्ये ग्राहकांना मास्क घालण्याची आवश्यकता नव्हती. दुसरीकडे, अॅप्पलने म्हटले आहे की, ग्राहक आणि कर्मचार्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क अनिवार्य आहे.