students in school

सध्या स्थितीत कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने शासनाने लहान मुलांची काळजी घेताना शाळेत ऐच्छिक उपस्थितीचा निर्णय बदलला पाहिजे. परिस्थितीत बदल होत नाही तोपर्यंत पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना फक्त आॅनलाईन शिक्षणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. सर्व नियमावलीचे सक्तीने पालन करणे फक्त शाळांची जबाबदारी आहे काय?, असा सवाल टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंडया यांनी केला आहे(Are schools solely responsible for student safety? Question of Teachers Democratic Front).

    मुंबई : सध्या स्थितीत कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने शासनाने लहान मुलांची काळजी घेताना शाळेत ऐच्छिक उपस्थितीचा निर्णय बदलला पाहिजे. परिस्थितीत बदल होत नाही तोपर्यंत पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना फक्त ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. सर्व नियमावलीचे सक्तीने पालन करणे फक्त शाळांची जबाबदारी आहे काय?, असा सवाल टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंडया यांनी केला आहे(Are schools solely responsible for student safety? Question of Teachers Democratic Front).

    कोरोनाचा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. लहान मुलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी लसीकरणाबाबत सरकारी निर्णय नसल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे. तरीही राज्य शासनाने राज्यातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा बुधवार पासून सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.

    महानगर क्षेत्रात पुन्हा कोरोनाचे रूग्ण आढळल्याने मुलांना शाळेत पाठवण्यास पालक संभ्रमित आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे हे पालकांसाठी ऐच्छिक असून वर्गात उपस्थिती कमी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यापूर्वी पालकांना संमतीपत्र द्यावे लागणार आहे.

    प्रशासनाने सर्व शाळांमध्ये कोरोना नियमाचे पालन सक्तीने करण्याचे सुचवले आहे. पण कोरोनाची लक्षणे आढळल्यास विद्यार्थ्यांसाठी स्थानिक उपचार केंद्राची यादी जाहीर केलेली नाही.जे पूर्वी कोविड सेंटर कार्यरत होते. ते सध्या बंद करण्यात आले आहे. बाधित झाल्यास मुलांना कुठे उपचारासाठी दाखल करायचे ?असे पालक विचारतात.

    विद्यार्थ्यांच्या ऐच्छिक उपस्थितीचे निर्देश असल्याने शिक्षकांना वर्गात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन पद्धतीने शिकवावे लागणार आहे. त्या शाळांना व शिक्षकांना वेगळे वेळापत्रक तयार करावे लागले आहे.असेही राजेश पंडया यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत.