अटक केलेल्या महिला शिक्षकांची तातडीने सुटका करावी: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची संबंधितांना सूचना

महिला शिक्षिकांना मुलुंड चेक नाका येथे अडविण्यात आले. या महिलांना आझाद मैदान येथे जाण्यापासून मज्जाव करण्यात आला व त्या महिलांना नवघर पोलिस ठाण्यात डांबण्यात आले. ही गंभीर बाब विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्या महिलांना तातडीने सोडण्याबाबत संबंधितांना सूचना देण्याचे आश्वासन दिले. 

    मुंबई (MUMBAI) :  शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी आझाद मैदानाकडे येणाऱ्या शिक्षक संघटनेच्या महिला शिक्षिकांना मुलुंड चेक नाका येथे अडविण्यात आले. या महिलांना आझाद मैदान येथे जाण्यापासून मज्जाव करण्यात आला व त्या महिलांना नवघर पोलिस ठाण्यात डांबण्यात आले. ही गंभीर बाब विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्या महिलांना तातडीने सोडण्याबाबत संबंधितांना सूचना देण्याचे आश्वासन दिले.

    महिलांना तातडीने सोडण्याची मागणी
    शिक्षकांना त्यांची जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शिक्षकांचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनस्थळी येण्यासाठी मुलुंडवरून ४०-५० महिला आझाद मैदानाकडे निघाल्या होत्या. पण पोलिसांनी या महिलांना जबरदस्तीने ताब्यात घेतले व त्यांची रवानगी पोलिस ठाण्यात केली. त्यामुळे त्या महिलांना तातडीने सोडण्याची मागणी विरोधी पक्ष नेते दरकरे यांनी केली. दरेकर यांनी माहितीच्या मुद्याव्दारे (पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन) च्या माध्यमातून हा विषय मांडला.

    न्याय मागण्याचा सर्वांचा हक्क
    लोकशाहीच्या माध्यमातून न्याय मागण्याचा सर्वांचा हक्क आहे. पण आंदोलनासाठी उपस्थित राहण्यासाठी जाणाऱ्या शिक्षिकांना पोलिसांनी ताब्यात घेणे हे अन्यायकारक आहे. हे आंदोलन चिरडण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहे.  शिक्षिकांच्या मागण्यांबाबत सर्वंकष विचार करून यामध्ये तोडगा काढण्याच्या दृष्टीने बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सभागृहात दिले.