लक्झरी लाइफस्टाइलच्या शौकीन महिला अधिकाऱ्याला तुरुंगात साधी चप्पलही मिळेना! अनवाणी फिरण्याची ओढवलीये वेळ

दिव्या मित्तलला ज्या कपड्यांमध्ये तिला अटक करण्यात आली होती त्याच कपड्यांमध्ये ती तुरुंगात दिसली.

    अजमेर : हरिद्वारमधील एका वैद्यकीय कंपनीकडून 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एसओजी एएसपी दिव्या मित्तल
    (divya mittal) सध्या अजमेरच्या (ajmer) मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत. सगळ्या सोईसुविधा असलेलं जीवन जगणाऱ्या या महिला अधिकाऱ्याची अवस्था आता अतिशय वाईट आहे. तिला तुरुंगात घालायला साधी चप्पलही मिळत नाहीये. दिव्या मित्तल  सध्या ३ फेब्रुवारीपर्यंत तुरुंगात मुक्कामी राहणार आहे.

    2 कोटींच्या घोटाळ्याने पोहचवले तुरुंगात

    आतापर्यंत घोटाळ्यांद्वारे कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या दिव्या मित्तलने आपल्या लक्झरी जीवनशैलीसाठी लाखो रुपये खर्च केले असतील. पण आता तुरुंगात असलेल्या दिव्या मित्तलची अतीशय दयनीय अवस्था झाली आहे. अजमेर विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच कारागृहाला भेट दिली. यावेळी कारागृहात बंद असलेल्या सर्व महिला गुन्हेगारांकडून त्यांच्या वकिलांची माहिती घेण्यात आली.

    कैद्यांसह रांगेत उभी दिसली

    दिव्या मित्तलला ज्या कपड्यांमध्ये तिला अटक करण्यात आली होती त्याच कपड्यांमध्ये ती तुरुंगात दिसली. ज्या महिला गुन्हेगारांना त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वकील नव्हता. विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने त्यांना वकील उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले.

    16 जानेवारीला झाली अटक

    दिव्या मित्तल यांना 16 जानेवारी 2023 रोजी अटक करण्यात आली होती. ती सध्या पोलीस कोठडीत आहे. राजस्थान नागरी सेवा नियम 1958 च्या नियम 13(2) मध्ये दिलेल्या अधिकारांचा वापर करून, दिव्या मित्तल यांना 16 जानेवारी 2023 पासून तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. 

    काय आहे संपूर्ण प्रकरण? 

    एसओजीच्या अतिरिक्त एसपी दिव्या मित्तल आणि अजमेरमधील बडतर्फ कॉन्स्टेबल सुमित यांनी एका वैद्यकीय कंपनीच्या मालकाला अटकेपासुन वाचवण्यासाठी  तब्बल 2 कोटी रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.सुमित कुमार अद्याप फरार असून एसीबीची अनेक पथके त्याच्या शोधात आहेत. दरम्यान, अजमेरमधील जयपूर रोडवरील एआरजी सोसायटीमधील दिव्याच्या फ्लॅटमध्ये दिव्याच्या उपस्थितीतही शोधमोहीम राबवण्यात आली. उदयपूर येथील त्यांच्या शेतातूनही अनेक संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या बद्ल दिव्या मित्तल म्हणाली होती की, मला ड्रग माफियांचा तपास यशस्वी केल्याप्रकरणी हे बक्षीस मिळाले आहे. मी कोणाकडूनही लाच मागितलेली नाही. ड्रग्ज माफिया हे कट रचून मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. यात अजमेर पोलिसांचे अनेक अधिकारी गुंतले आहेत.