वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; १८ जागांसाठी १०० पेक्षा जास्त अर्ज

संस्था गटातून तसेच हमाल तोलाई गटातून सदर परिसराला नेतृत्व मिळत गेले आहे. परिणामी यावेळी ग्रामपंचायत व संस्था गटातून मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केली असून, महाविकास आघाडी आवडे कोरे व महाडिक गटातून नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वसामान्य मतदाराचे लक्ष केंद्रित झाले आहे.

    पेठवडगांव : वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Wadgaon Agricultural Produce Market Committee) चाललेल्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कार्यक्षेत्र परिसरातून ग्रामपंचायत व संस्था गटातून निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून, सदर अर्ज वेगवेगळ्या गटातून दाखल झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

    वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 जागांपैकी संस्था गटासाठी 11 जागा ग्रामपंचायत गटासाठी 4 जागा व्यापारी गटासाठी 2 जागा व हमाल तोलाई गटासाठी 1 जागा अशा एकूण 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. हातकणंगले तालुक्यातील एकूण 60 गावांपैकी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 4451 इतकी मतदार नोंदणी आहे. सर्वात कमी मतदान हमाल तोलाई गटासाठी 58 इतके आहे.

    परिसरात महाविकास आघाडीबरोबरच आवडे, महाडिक व कोरे गटाचे स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना गटाचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व असून, महाविकास आघाडीबरोबरच सध्या महाडिक, कोरे, आवडे गटातून अनेक इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. परिणामी, गेल्या पंचवीस वर्षापासून वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधीत्व महादेवराव महाडिक व आमदार विनय कोरे, आवाडे यांच्या माध्यमातून मिळाले आहे.

    संस्था गटातून तसेच हमाल तोलाई गटातून सदर परिसराला नेतृत्व मिळत गेले आहे. परिणामी यावेळी ग्रामपंचायत व संस्था गटातून मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केली असून, महाविकास आघाडी आवडे कोरे व महाडिक गटातून नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वसामान्य मतदाराचे लक्ष केंद्रित झाले आहे. परिणामी, गेल्या पंचवीस वर्षात वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच चुरस लागल्याचे चित्र दिसत असून, कालपर्यंत 17 जागांसाठी 100 पेक्षा जास्त अर्ज दाखल झाले होते. तसेच आज सायंकाळपर्यंत आणखी पन्नास अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. उमेदवार निवडताना नेत्यांना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे.