प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

    पुणे : हडपसर परिसरात गुन्हेगारीचा चांगलाच उन्माद झाला असून, दारू उधार न दिल्यावरून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाईन शॉप मालकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. परंतु, यामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आल्याचे पाहिला मिळत आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस (Pune Police) ठाण्यात स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    याप्रकरणी संतोष भिमराज घुले (वय २९) व ओंमकार शाम घाडगे (वय २६) यांना अटक केली आहे. तर, त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. याबाबत साईराज हिंगणे (वय २७) यांनी तक्रार दिली आहे. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
    हिंगणे यांचे मांजरी परिसरात शिवाज्ञा बिअर शॉपी आहे. आरोपी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बिअर शॉपीत आले होते. त्यांनी उधारीवर दारू मागितली. त्यावरून तक्रारदार व त्यांच्यात वाद झाला असता या आरोपींनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर पाठीवर दगडाने मारले. तक्रारदारांनी पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर या दोघांना अटक केली आहे.

    nतर, दुसरा प्रकार देखील हडपसरमधील मांजरीतच घडला आहे. याप्रकरणी राहुल दत्तात्रय घुले (वय ३५, रा. मोरे वस्ती) याला अटक केली आहे. याबाबत मंगेश पाबळे (वय २४) यांनी तक्रार दिली आहे. रविवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. पाबळे यांचे विलास वाईन शॉप आहे. व्हिस्कीची बॉटल मागतिली. ती तक्रारदारांनी न दिल्याने त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी त्याने कंबरेला लावलेला कोयता काढून तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत त्यांच्यावर कोयत्याने वार केले व त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास उपनिरीक्षक एस. एस. गाडेकर हे करत आहेत.