तुळजाभवानी मंदीर व परिसर विकासासह मुख्य गाभारा सोन्याच्या पत्र्याने मढवण्याचा प्रयत्न : राणा जगजितसिंह पाटील

    उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी तिर्थक्षेत्र केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत बसऊन मंदीर व १५ किमी परिसर विकास आरखड्यासोबतच पुरातत्व विभागाच्या सल्याने आई भवानीचा मुख्य गाभारा सोण्याच्या पत्र्याणे मढवण्याचा प्रयत्न असुन त्यासाठी लवकरच सल्लागार नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती तुळजापुर विधानसभेचे भाजपा आमदार तथा मंदीर संस्थान सदस्य राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.