पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच आत्महत्येचा प्रयत्न; एकावर गुन्हा

एका व्यक्तीने अंगावर डिझेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि.१५) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालय येथे घडली. याप्रकरणी शब्बीर महबूब तांबोळी यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

    सोलापूर : एका व्यक्तीने अंगावर डिझेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि.१५) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालय येथे घडली. याप्रकरणी शब्बीर महबूब तांबोळी यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अमर गोरख थोरबोले (वय-३५, रा. मु.पोस्ट बार्शी उपळाई रोड, बार्शी रोड, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी अमर थोरबोले यांच्या नावावर शिवशक्ती अर्बन को ऑफ बार्शी शाखा शिवाजीनगर यांनी २५ लाख रुपये कर्ज काढून अमर यांना पैसे न देता त्यांनीच पैसे उचलले व आता अमर यांनाच पैसे भरावे लागत असल्याबाबत वारंवार तक्रार दिली.

    मात्र, तक्रार देऊन देखील बार्शीतील पोलीस निरीक्षक शेळके हे जबाब घेऊन देखील कारवाई करत नसल्याने अंगावर डिझेल इंधन असलेली बॉटल ओतून हातात काडीपेटी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोसई बेवडे हे करीत आहेत.