प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित दाम्पत्याचा मध्यरात्रीच्या सुमारास विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

नवविवाहित दाम्पत्याने मध्यरात्रीच्या सुमारास विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Couple attempted suicide) केला. हा प्रकार कुटुंबीयांच्या उशिरा लक्षात आल्यानंतर दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू (Death of wife) झाला तर पती आयुसीयुमध्ये उपचार घेत आहे.

    नागपूर (Nagpur) : काही दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने मध्यरात्रीच्या सुमारास विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Couple attempted suicide) केला. हा प्रकार कुटुंबीयांच्या उशिरा लक्षात आल्यानंतर दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू (Death of wife) झाला तर पती आयुसीयुमध्ये उपचार घेत आहे. त्याची प्रकृती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आकांक्षा अश्‍विन कानेकर (२३, रा. अंबेनगर, भांडेवाडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अश्‍विन कानेकर असे अत्यव्यस्थ (Husband’s struggle) असलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

    आकांक्षा आणि अश्‍वीन हे दोघेही एकाच वस्तीत राहत होते. अश्‍वीन हा एमआयडीसीतील खासगी कंपनीत नोकरीला आहे तर आकांक्षा ही पदवीचे शिक्षण घेत होती. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यामुळे त्यांनी घरच्यांच्या संमतीने काही दिवसांपूर्वीच प्रेमविवाह केला. दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. वृद्ध सासू-सासरे आणि हे पती-पत्नी असे चौघे जण एकत्र राहत होते.