अयोध्येच्या मंदिरात मुस्लिम रामभक्त; दर्शनाने भाविकांचे डोळे पाणावले

सोशल मीडियावर सध्या मुस्लिम राम भक्त दर्शनासाठी आलेला व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये काही मुस्लिम बांधव हे रामांच्या दर्शनासाठी आले असून दर्शनानंतर त्यांचे डोळे पाणावले आहेत.

    अयोध्या : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर उद्घाटन (Ram Mandir Inauguration) सोहळ्यानंतर रामभक्तांची पाऊले मंदिराकडे वळाली आहेत. दररोज लाखो भाविक प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी अयोध्यानगरीमध्ये दाखल होत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या मुस्लिम राम भक्त (Muslim Ram Devotees) दर्शनासाठी आलेला व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये काही मुस्लिम बांधव हे रामांच्या दर्शनासाठी (Muslim in Ayodhya) आले असून दर्शनानंतर त्यांचे डोळे पाणावले आहेत.

    अयोध्येच्या राम मंदिरामध्ये मुस्लिम राम भक्त देवाचा जयजयकार करत दर्शन घेत आहेत. हे सर्व मुस्लिम रामभक्त लखनऊहून अयोध्येला आले आहेत. हजारो मुस्लिम भक्त अयोध्येत दाखल होऊन राम मंदिराचे दर्शन घेत असल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. आत्तापर्यंत तब्बल 29 जानेवारीपर्यंत सुमारे 20 लाख लोकांनी दर्शन घेतले असून मंदिर ट्रस्टला दर्शनवेळेमध्ये देखील या गर्दीमुळे वाढ करावी लागली आहे. मात्र सध्या मुस्लिम राम भक्तांचे मोठ्या प्रमाणातील दर्शन चर्चेचा विषय ठरत आहेत.

    हे मुस्लिम रामभक्त हे मुस्लिम राष्ट्रीय मंचचे असून यातील मुस्लिमांचा एक गट अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी आला. प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम रामभक्त कबीर मठातून बाहेर पडले आणि मुख्य मार्ग रामपथमार्गे भक्तिमार्गावर आले. यावेळी सर्वजण जय श्री राम आणि वंदे मातरम् असा जयघोष केला. देशातील एकतेचे व प्रेमाचे हे दृश्य असल्याची भावना नेटकरी सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.