आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग २० चा कायापालट

सातारा -जावली तालुक्याचे भाग्यविधाते व नगर विकास आघाडीचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २० मध्ये विविधप्रकारची विकासकामे मार्ग लावली आहेत.

    सातारा : सातारा -जावली तालुक्याचे भाग्यविधाते व नगर विकास आघाडीचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २० मध्ये विविधप्रकारची विकासकामे मार्ग लावली आहेत. नुकतेच ३२ लाख रुपये निधीतून तीन रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम पुर्ण करण्यात आले आहे. गेल्या ५ वर्षात प्रभागातील सर्व भागातील विकासकामे मार्गी लावून नागरिकांना दिलेला शब्द पाळला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा कायापालट केला असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहू, असा शब्द नगरसेविका लीना गोरे यांनी दिला.

    भुयारी गटार योजनेंतर्गत खोदलेल्या रस्तांमुळे प्रभागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावरुन चालणे, वाहन चालवणे यामध्ये अडचणी येत होत्या. छोट्या- मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत होते. खराब रस्त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत होते. नागरिकांची गरज लक्षात घेऊन नगरसेविका गोरे यांनी नगरपालिकेत पाठपुरावा करुन निधी मंजूर करुन घेतला. आण्णाभाऊ साठे (दलित वस्ती) योजनेंतर्गत खारी विहीर मस्जिद, बर्गे आळी, पिंपळेश्वर चौक ते जय महाराष्ट्र मंडळ अखेर २० लाख, होलार गल्ली अहिल्यादेवी होळकर, शरद शेलार घर, भोकरे घर ,पद्मावती मंदिर ते पिपळेश्वर मदिर चौक ८ लाख रुपये व जनरल फंडातून मुळे घर ते दस्तगीर काॅलनी ५ लाख असा निधी उपलब्ध करून रस्ता डांबरीकरण करण्याचे काम वेळेत पूर्ण करून घेतले. पावसाने उघडीप दिल्याने पावसाळ्यात नागरिकांना त्रास होवू नये म्हणून पावसाळ्यात आधी रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्ण करून घेतल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.