म्हाडाच्यावतीने गिरणी कामगारांना सोडतीमार्फत मिळणा-या घरांसाठी जे गिरणी कामगार पात्र असतील त्यांना घरांसाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध करुन देता येईल काय या दृष्टीने मुंबई बॅंक व म्हाडा एकत्रितपणे सकारात्मक विचार करेल असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता(Bank loan for mill workers? Housing Minister Awhad responds positively to Opposition Leader Darekar's suggestion).

    मुंबई : म्हाडाच्यावतीने गिरणी कामगारांना सोडतीमार्फत मिळणा-या घरांसाठी जे गिरणी कामगार पात्र असतील त्यांना घरांसाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध करुन देता येईल काय या दृष्टीने मुंबई बॅंक व म्हाडा एकत्रितपणे सकारात्मक विचार करेल असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता(Bank loan for mill workers? Housing Minister Awhad responds positively to Opposition Leader Darekar’s suggestion).

    एमएमआरडीएच्या घरांच्या सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या विजेत्या गिरणी कामगारांना घराचा ताबा मिळण्याबाबतचा प्रश्न विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारण्यात आला. यावेळी बोलताना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा विषय अतिशय पोटतिडकीने हाताळाला. त्यांनी गिरणी कामगारांना घरे दिली. परंतु पात्र गिरणी कामगारांना घरांसाठी कोणतेही बॅंक कर्ज देण्यासाठी तयार होत नाही.

    नामवंत बॅंकेकडे जाऊनही त्यांना कर्ज मिळत नाही, कारण त्यांची वयाची ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे अशा गिरणी कामागांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने एक मॅकेनिझम तयार करावे. त्यांना आपले घर भाड्याने देण्याची परवानागी द्यावी जेणेकरुन त्यांची कर्जाचे पैसे भरण्याची व्यवस्था होऊ शकेल. मुंबई बॅंकेने अशा गिरणी कामगारांना कर्ज दिले आहे व भविष्यातही बॅंकेच्या वतीने अशी कर्ज देता येतील अशी सूचनाही दरेकर यांनी केली.

    गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी दरेकर यांच्या सचूनेचा सकारात्मक विचार करुन गिरणी कामगारांना घरासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने मुंबई बॅंकेनही पर्याय द्यावा. भविष्यात म्हाडा मार्फत गिरणी कामगारांना देण्यात येणा-या घरांसाठी कर्ज देण्यासाठी मुंबई बॅंक व म्हाडा एकत्रित बैठक घेऊन यांसदर्भात सकारात्मक विचार करेल असे आश्वासनही आव्हाड यांनी दिले.