
हजारो कोटींच्या देवस्थान जमीन घोटाळ्याच्या आरोपावर भाजपा आमदार सुरेश धस यांनी मौन सोडत पाहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ५० करोड द्या मी घरदार सगळं तुमच्या नावावर करून जिल्हा सोडतो असे वक्तव्य त्यांनी जाहीर सभेत केले आहे(Beed: Just pay Rs 50 crore. I will leave the district in your name; Statement of BJP MLA Suresh Dhas in public meeting).
बीड : हजारो कोटींच्या देवस्थान जमीन घोटाळ्याच्या आरोपावर भाजपा आमदार सुरेश धस यांनी मौन सोडत पाहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ५० करोड द्या मी घरदार सगळं तुमच्या नावावर करून जिल्हा सोडतो असे वक्तव्य त्यांनी जाहीर सभेत केले आहे(Beed: Just pay Rs 50 crore. I will leave the district in your name; Statement of BJP MLA Suresh Dhas in public meeting).
तुमचं सरकार आहे चौकशी करा ढगात गोळ्या मारू नका. हजार कोटीचा आरोप करणाऱ्यांनी माझ्या कडील माझ्या वडलोपार्जित व मी कमावलेली सगळी प्रॉपर्टी मी त्यांच्या नावावर करतो मला फक्त पन्नास कोटी द्या मी घरदार सगळं घेऊन जिल्हा सोडतो असे आवाहन सुरेश धस यांनी तक्रारदारांना केला आहे. खोटे आरोप करून बदनाम करु नका असे देखील सुरेश धस म्हणाले.
बीडमधल्या देवस्थान जमिनीचा घोटाळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आरटीआय कार्यकर्ते राम खाडे आणि अॅड. असीम सरोदे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन या जमीन घोटाळ्यासंदर्भात भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप केले होते. आष्टीमधल्या देवस्थान आणि इनामी जमिनीपैकी काही जमीन खोट्या कागदपत्रांच्या मदतीने लाटल्याचा आरोप सुरेश धस यांच्यावर करण्यात आला आहे.