विधानसभा अध्यक्षपदासाठी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर!

महाविकास आघाडीकडे १७०चे संख्याबळ आहे. तर भाजपकडे १०६ आणि काही अपक्ष असे ११५ चे संख्याबळ आहे तर ३ सदस्य तटस्थ राहतील. मात्र भाजपचे १२ सदस्य निलंबीत असल्याने सध्या त्यांना मतदानात भाग घेता येणार नाही मविआ करीता जमेची बाजू आहे.

    मुंबई, विधिमंडळाचे केवळ पाच दिवसांचे हिवाळी अधिवेशनात मुंबईत २२ डिसेंबर पासून होणार आहे. या अधिवेशनात गेल्या दहा महिन्यापासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी  कॉंग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर असून येत्या दोन दिवसांत कॉंग्रेसकडून त्यांचे नाव अंतिम केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    शिरगणती न करता आवाजी मतदान
    यावेळी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या मतदानाने व्हावी यासाठी नियमात बदल करण्याबाबतचा निर्णय नियमसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत नियमातील बदलांना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंजूरी घेतली जाणार आहे. त्यानंतर २३ किंवा २४ डिसेंबरला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करूनआवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक घेण्याचा मविआ सरकारचा प्रयत्न आहे.

    महाविकास आघाडीकडे १७०चे संख्याबळ आहे. तर भाजपकडे १०६ आणि काही अपक्ष असे ११५ चे संख्याबळ आहे तर ३ सदस्य तटस्थ राहतील. मात्र भाजपचे १२ सदस्य निलंबीत असल्याने सध्या त्यांना मतदानात भाग घेता येणार नाही मविआ करीता जमेची बाजू आहे. या निवडणुकीत मतदानाचा आग्रह भाजपकडून केला जाणार असला तरी मते फुटण्यास संधी न देता शिरगणती न करता आवाजी मतदानानेच ही निवडणुक होणार असल्याची माहिती ज्येष्ठ मंत्र्यानी दिली.