विमान लघवी प्रकरणात मोठी कारवाई, एयर इंडियाला ३० लाखांचा दंड, पायलटचं लायसन्स ३ महिन्यांसाठी सस्पेंड

ही घटना घडली जेव्हा जो पायलट हे विमान उडवत होता, (piolet suspended) त्याला ३ महिन्यांसाठी सस्पेंड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    नवी दिल्ली : एयर इंडियाच्या विमानात (Air India Case) एका प्रवाशानं महिलेवर केलेल्या लघवी प्रकरणात हवाई वाहतूक महासंचलनालय (DCGI) मोठी कारवाई केली आहे. एयर इंडिया कंपनीला ३० लाख रुपयांचा दंड या प्रकरणात सुनावण्यात आलेला आहे. तर ही घटना घडली जेव्हा जो पायलट हे विमान उडवत होता, (piolet suspended) त्याला ३ महिन्यांसाठी सस्पेंड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच आपल्या कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणात एयर इंडियाच्या विमानात सेवा देणाऱ्यांवर तीन तीन लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.

    निरनिराळ्या नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारवाई

    गुरुवारी एयर इंडिायने विमान प्रवासी शंकर मिश्रा याला या कृत्यासाठी विमान वाहतूक करण्यास चार महिने बंदी घातली आहे. त्याच्यावर यापूर्वीच ३० दिवसांची बंदी घालण्यात आली होती. त्याच्या व्यतिरिक्त ही ४ महिन्यांची बंदी घालण्यात आली. डीजीसीएला ही घटना ४ जानेवारी रोजी समजली. एयर इंडियाकडून करण्यात आलेली ४ महिन्यांच्या बंदीची कारवाई की नियमांचं उल्लंघन करणारी असल्याचं सांगण्यात येतंय.

    एयर इंडियाच्या सीईओंनी मागितली माफी

    या घडलेल्या प्रकाराबद्दल एयर इंडियाच्या सीईओंनी माफी मागितली आहे. विमानाचा पायलट आणि चार क्रू मेंबर्सना तपास पूर्ण होईपर्यंत कामावरुन हटवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. विमानात किती दारु देण्यात यावे, या धोरणावरही कंपनी विचार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनीही या प्रकरणात नाराजी व्यक्त केली होती. ही वैयक्तिक खेदाची बाब असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या बाबत एयरइंडियाने ज्या गतीनं प्रकरणानंतर कारवाई करायला हवी होती, ती झाली नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.