भाजपला मोठा धक्का! ‘या’ कॅबिनेट मंत्र्याचा मंत्रिमंडळ बैठकीतच राजीनामा

उत्तराखंड मध्ये भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याने राजीनामा दिला आहे. हरकसिंग रावत यांनी बैठकीत मंत्रिपदाचा राजीनामा तर दिलाचं शिवाय यावेळी ते ढसाढसा रडले आहेत. 

    नवी दिल्ली : उत्तराखंड मध्ये भाजपच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं चित्र आहे. उत्तराखंड मध्ये भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याने राजीनामा दिला आहे. हरकसिंग रावत यांनी बैठकीत मंत्रिपदाचा राजीनामा तर दिलाचं शिवाय यावेळी ते ढसाढसा रडले आहेत.

    दरम्यान यावेळी त्यांनी भाजपविरोधात संताप व्यक्त करताना भिकारी करून टाकलं, असंही म्हटलं. त्यामुळे एकंदरीत आता भाजपच्या चिंतेत भर पडणार आहे.

    रावतांनी का राजीनामा दिला? 

    रावत हे मागील पाच वर्षापासून मेडीकल कॉलेजची मागणी करत होते. त्यांचं क्षेत्र असलेल्या कोटद्वारमध्ये मेडीकल कॉलेज व्हावं, अशी मागणी त्यांनी वारंवार मांडली. मात्र अनेकवेळा मुख्यमंत्री बदलूनही त्यांची मागणी पूर्ण झाली नाही. त्यांच्या मागणीकडे सर्वच मुख्यमंत्र्यानी दुर्लक्ष केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

    काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता… 

    रावत यांनी 2016 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची चिन्हे आहेत. रावत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपला कॉलेजचा मुद्दा मांडला होता. मात्र तिथेही त्यांनी काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी पदाचा राजीनामा देऊन टाकला आहेत.

    दरम्यान, हरकसिंग रावत हे राजीनाम देऊन बाहेर आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आश्रू तरळल्याचं पाहायला मिळालं. ते ढसाढसा रडताना दिसले. शिवाय रडत असताना त्यांनी ‘या लोकांनी भिकारी बनवून टाकलं’ असे उद्गारही काढले आहेत. रावत लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढणार आहेत.