Big News: Great shock to sports world! Shooter Konica Layak commits suicide

राष्ट्रीय रायफल नेमबाजपटू कोनिका लायकने आत्महत्या केल्याने क्रीडा जगताला धक्का बसला आहे. २६ वर्षीय कोनिका लायक झारखंडच्या धनबादची रहिवासी होती(Big News: Great shock to sports world! Shooter Konica Layak commits suicide).

    धनबाद : राष्ट्रीय रायफल नेमबाजपटू कोनिका लायकने आत्महत्या केल्याने क्रीडा जगताला धक्का बसला आहे. २६ वर्षीय कोनिका लायक झारखंडच्या धनबादची रहिवासी होती(Big News: Great shock to sports world! Shooter Konica Layak commits suicide).

    माजी ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कार विजेते जयदीप कर्माकर यांच्यासोबत कोनिका कोलकाता येथे प्रशिक्षण घेत होती, असे सांगण्यात येत आहे. कोनिकाने वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने कोनिकाला तिच्या खेळासाठी रायफल भेट दिली होती.

    कोनिका पूर्वी जुन्या रायफल वापरायची. त्या रायफली तिच्या प्रशिक्षकांच्या किंवा मित्रांच्या असायच्या. राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती त्याच जुन्या रायफलने शूटिंग करत असे. जेव्हा सोनूला तिच्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्याने या नवोदित खेळाडूला मार्च महिन्यात एक नवीन रायफल भेट दिली. जेणेकरुन ती तिच्यातील कलागुणांना आणखी वाव देऊ शकेल.