नितीन राऊतांना मोठा धक्का; काॅंग्रेसनं ‘या’ पदावरुन हटवलं

नितीन राऊत यांना काँग्रेस एससी विभागाच्या अध्यक्षपदावरून काढण्यात आलं आहे. त्यामुळे आता सगळीकडे एकच चर्चा होत आहे. आता नितीन राऊत यांच्या जागी राजेश लिलोठिया यांना संधी देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच काॅंग्रेस पक्षाने नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नितीन राऊत आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना समन्स बजावले होते. अशातच आता काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना मोठा धक्का मिळाला आहे.

    नितीन राऊत यांना काँग्रेस एससी विभागाच्या अध्यक्षपदावरून काढण्यात आलं आहे. त्यामुळे आता सगळीकडे एकच चर्चा होत आहे. आता नितीन राऊत यांच्या जागी राजेश लिलोठिया यांना संधी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून नितीन राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये वाावाद होत आहे. आता हे काॅंग्रसचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर यायला लागले आहेत. राऊत यांना हे पद सोडावे लागणार आहे. या संदर्भात काँग्रेसने ट्वीट करत माहिती दिली आहे.

    दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाचे दिल्लीवरून नाव आलेले नाही. त्यामुळे त्याचीच चर्चा सुरु असल्याचं चित्र आहे. उद्या सकाळपर्यंत नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.