CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत सर्वात मोठा खुलासा! नेमकी चूक कुणाची? चौकशी समितीच्या अहवालात समोर आली धक्कादायक महिती

तामिळनाडूत ८ डिसेंबर २०२१ रोजी सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर पायलटच्या चुकीमुळे क्रॅश झाले होते. या हेलिकॉप्टरमध्ये कोणताही तांत्रित दोष नव्हता, तसेच यामागे कोणतीही बेपर्वाई किंवा कट नसल्याचे समोर आले आहे. तिन्ही सैन्यदलांनी केलेल्या एकत्र चौकशीत म्हणजेच ट्राय सर्व्हिसेस कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या प्राथमिक अहवालात दुर्घटनेचे हे कारण देण्यात आले आहे(Biggest revelation about CDS Bipin Rawat's helicopter crash! Whose fault is it? The report of the inquiry committee came up with shocking information).

  नवी दिल्ली : तामिळनाडूत ८ डिसेंबर २०२१ रोजी सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर पायलटच्या चुकीमुळे क्रॅश झाले होते. या हेलिकॉप्टरमध्ये कोणताही तांत्रित दोष नव्हता, तसेच यामागे कोणतीही बेपर्वाई किंवा कट नसल्याचे समोर आले आहे. तिन्ही सैन्यदलांनी केलेल्या एकत्र चौकशीत म्हणजेच ट्राय सर्व्हिसेस कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या प्राथमिक अहवालात दुर्घटनेचे हे कारण देण्यात आले आहे(Biggest revelation about CDS Bipin Rawat’s helicopter crash! Whose fault is it? The report of the inquiry committee came up with shocking information).

  याबाबत भारतीय हवाई दलाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात, अचानक हवामान बदलामुळे, ढग समोर आल्याने, हे हेलिकॉप्टर पायलटकडून डोंगरांला धडकल्याचे सांगण्यात आले आहे. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार,  फ्लाईट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरच्या तपासणीत कोणत्याही प्रकारची बेपर्वाई, मशिनशी छेडछाड वा चॉपरमध्ये तांत्रिक बिघाड झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेत जनरल रावत त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह १२ जणांचा मृत्यू झाला होता.

  मास्टर ग्रीन श्रेणीचा पायलट

  हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर ते झाडांवर पडले होते, आणि त्यानंतर त्याला आग लागी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते. हे हेलिकॉप्टर मास्टर ग्रीम श्रेणीचे चालक दल उडवीत होते. हेलिकॉप्टर उडवणारा पायलट आणि क्रू मेंबर्स हे अनुभवी आणि प्रशिक्षित होते. त्यामुळेच हा अपघात कसा झाला, याच्या चौकशी अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष होते.

  चौकशी अहवालातील सूचना

  या प्रकरणी चौकशी समितीने एक अहवाल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडेही सोपवला आहे. त्यात व्हीहीआयपी व्यक्तींचे विमान उडवणाऱ्या पायलट मास्टर ग्रीम श्रेणीचा असला, तरी खराब हवामानाच्यावेळी एअर ट्राफिक कंट्रोलरला त्याला सल्ला देण्याचा अधिकार असण्याचे आणि प्रसंगी अंतिम निर्णय़ घेण्याचे अधिकार द्यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.

  हे सुद्धा वाचा
  • 2022