म्हाडाच्याही पेपरफुटी प्रकरणाने राजकीय राजकीय वातावरण तापत असतानाच पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी धक्कादायक खुलासे केले आहेत.
पुणे : आरोग्य भरती पेपरफुटीपाठोपाठ म्हाडाच्याही पेपरफुटी प्रकरणाने राजकीय राजकीय वातावरण तापत असतानाच पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या पेपरफुटीमागे राज्यात कोट्यावधींचे रॅकेट असल्याचे समोर आले आहे. एंजटद्वारे आलेल्या परीक्षार्थ्यांनी उतीर्ण करण्यासाठी मुख्य आरोपींने अफलातून प्लॅनिंग केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपीला परिक्षार्थींकडून प्रत्येकी १० लाख रुपये मिळणार होते. तसेच राज्यातील कित्येक एंजटसही या प्रकरणात सक्रिय असून, त्यापैकी केवळ १० जणांचेचं नावे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहेत.
प्रत्येकी १० लाखांची डील
म्हाडाची लेखी परीक्षा आयोजित करुन त्याच्या निकाला पर्यंत सर्व कामांचे कंत्राट पुण्यातील जी. ए सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आले होते. या गोष्टीचा गैरफायदा घेत देशमुख यांने राज्यभरातील एंजट्शी संपर्क साधून गुण वाढवून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी १० लाखांची डील केली होती. त्यावरील रक्कम एजंट स्वीकारणार होते.
दरम्यान आगाऊ पैसे देणाऱ्या परिक्षार्थींना उत्तरपत्रिका चक्क कोऱ्या ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता. संबंधित उत्तरपत्रिका आरोपी देशमुख यांच्या जी. एस सॉफ्टवेअर कंपनीच्या ताब्यात देण्यात येणार होत्या.
१० एजंटचा शोध सुरू
राज्यभरातील १० एजंट्स पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. पुणे सायबर पोलिसांना राज्यातील १० एजंट्ची माहिती मिळाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस आयुक्त, अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त, भाग्यश्री नेवटके , मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, दगडू हाके, अंकुश चिंतामण, कुमार घाडगे, मीनल पाटील आणि अनिल डकळ करीत आहेत.