मध्यप्रदेश-छत्तीसगड विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून खासदारपदासाठी उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री बघेल विरोधात नातेवाईकाला उमेदवारी

या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत.

  नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) घोषणा होण्यापूर्वीच मध्य प्रदेशसाठी (Madhya Pradesh) 39 आणि छत्तीसगडसाठी (Chhattisgarh) 21 उमेदवारांची घोषणा (MP Chhattisgarh Assembly Election) केली. पक्षाने या दोन राज्यांसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत प्रत्येकी पाच महिलांना उमेदवारी दिले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांच्या विरोधात पक्षाने त्यांचे नातेवाईक विजय बघेल यांना उमेदवारी दिली आहे.

  विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बुधवारी (16 ऑगस्ट) दिल्लीत बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सीईसीचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. उर्वरित काही जागांचे उमेदवार एक-दोन दिवसांत जाहीर होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  मध्यप्रदेशमधून कोणाला उमेदवारी

  भाजपने जबलपूर पूर्वमधून आंचल सोनकर, झाबुआमधून भानू भुरिया आणि मध्य प्रदेशातील छतरपूरमधून ललिता यादव यांना उमेदवारी दिली आहे. तर ध्रुव नारायण सिंग यांना भोपाळ सेंट्रलमधून आणि आलोक शर्माला भोपाळ उत्तरमधून तिकीट मिळाले आहे.

  छत्तीसगडमधून कोणाला उमेदवारी

  पक्षाने छत्तीसगडमधील कोरबा विधानसभा मतदारसंघातून लखनलाल दिवांगन आणि पाटणचे खासदार विजय बघेल यांना उमेदवारी दिली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल विधानसभेत पाटण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

  या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र,  भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत.